नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी नंदुरबारात सभा होत आहे़ सभेची वेळ सकाळी ११.३० वाजेची देण्यात आलेली होती़ त्यामुळे सकाळपासूनच अनेक कार्यकर्ते सभा ठिकाणी हजर होते़ परंतु तत्पुर्वी मोदी यांची सभा पिंपळगाव येथे असल्याने त्यांना प्रत्यक्षात नंदुरबारात येण्यासाठी दुपारी दीड वाजले़ मोदी यांचे हॅलीकॉप्टर हेलीपॅडवर येताच शेकडो कार्यकर्त्यांनी मोदींच्या दिशेने धाव घेतली़ यामुळे पोलीसांची मात्र चांगलीच धावपळ उडाली होती़
मोदी आले अन् हेलीपॅडकडे धावत सुटले शेकडो कार्यकर्ते...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 13:52 IST