शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
2
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
3
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
7
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
8
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
9
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
10
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
11
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
12
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
13
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
14
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
15
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
16
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
17
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
18
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
19
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
20
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण

मोबाईल दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 11:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील शास्त्री मार्केटमधील मोबाईल दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील शास्त्री मार्केटमधील मोबाईल दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली़ घटना उघडकीस आल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती़संतोष इंदरलाल साहित्या यांच्या मालकीचे हे दुकान असून रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते दुकाने उघडण्यासाठी गेले असता, शटर उचकटलेले दिसून त्यांनी आत प्रवेश करुन माहिती घेतली असता, दुकानातील मोबाईल आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे समजून आले़ चोरट्यांनी गल्ल्यात ठेवलेले ४४ हजार रुपये रोख व १ लाख ७२ हजार ७३८ रुपयांचे विविध कंपन्यांचे मोबाईल चोरीला गेल्याचे दिसून आले़ घटनेची माहिती संतोष साहित्या यांनी शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, सहायक पोलीस निरीक्षक दिवटे, पोलीस उपनिरीक्षक सुनील बिºहाडे यांनी भेट देत माहिती जाणून घेतली़शास्त्री मार्केट हे शहराच्या मध्यवर्ती भागात आहे़ यातून परिसरात रहिवासी वस्तीही आहे़ उशिरापर्यंत या भागात नागरिकांची वर्दळ असते़ यातून चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्र ते रविवार पहाटे या दरम्यान चोरी केल्याचा पोलीसांचा अंदाज आहे़ दरम्यान चोरट्यांनी तब्बल ४४ नवे मोबाईल चोरुन नेल्याचे पंचनाम्यातून समोर आले होते़ घटनेनंतर पोलीस पथकाने श्वानाला पाचारण करुन माग काढण्याचा तसेच ठसेतज्ञांनी ठसे संकलित करुन चोरट्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला आहे़ उशिरापर्यंत पोलीसांकडून परिसराची झडती घेण्यात येत होती़याबाबत संतोष साहित्या यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल आहे़ तपास पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर करत आहेत़दुकानमालक साहित्या हे मोबाईल विक्री करण्यासोबतच रिपेअरींगचेही काम करतात़ चोरी झाली त्यावेळी त्यांच्या दुकानात पाच ते सहा जणांचे मोबाईल रिपेअरींगसाठी आले होते़ चोरट्यांनी ते ही लंपास केले आहेत़ या मोबाईल्सची किंमत माहिती नसल्याने सोमवारी त्याची माहिती घेऊन पोलीसात पुन्हा नोंद होणार आहे़ यातून चोरीतील रकमेचा आकडा वाढणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़