चोरी नव्हे गहाळ...
मोबाईल चोरीची फिर्याद किंवा तक्रार देण्यास कुणी गेल्यावर त्याच्या तक्रारीत चोरी हा शब्द वापरला जात नाही तर गहाळ हा शब्द वापरला जातो. याबाबत तक्रारकर्ता आणि पोलीस यांच्यात काहीवेळा वादविवादही होतो. परंतु पोलीस दप्तरी गहाळ हाच शब्द वापरला जात असल्याचे स्पष्ट होते.
बाजारात आणि रहदारीच्या रस्त्यांवर मोबाईल सांभाळा
मोबाईल गहाळ अर्थात चोरी होण्याचे प्रमाण हे सर्वाधिक बाजार परिसर व रहदारीच्या रस्त्यांवर अधिक असते. त्यामुळे अशा भागात जातांना आपला मोबाईल पॅण्टच्या खिशात ठेवावा. महिलांनी सहसा पर्समध्ये मोबाईल ठेवावा असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.
५३ मोबाईल केले परत
पोलिसात दाखल मोबाईल गहाळच्या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी इएमआय नंबरचे तांत्रिक विश्लेषण करीत चोरीचे मोबाईल जप्त केले होते. त्यांची संख्या तब्बल ५३ इतकी होती. नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यासह लगतच्या गुजरात व मध्य प्रदेश राज्यातून ७ लाख २ हजार रुपये किंमतीचे एकूण ५३ मोबाईल परत मिळवण्यात एलसीबीला यश आले. दरम्यान, आणखी किमान ४० मोबाईल जप्त करून ते मूळ मालकांना परत दिले जाणार आहेत.