शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल व मोटारसायकल चोर शहाद्यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातून मोटारसायकल चोरी करून गावातच अज्ञात ठिकाणी लपवत डिक्कीमधील मोबाईल चोरून पोबारा करणा:या चोरटय़ाचा प्रय} तालुक्यातील खेडदिगर येथील जागरूक युवकांमुळे फसला. त्या चोराकडून मोबाईल व मोटारसायकल जप्त करण्यात आली.याबाबत मिळालेली माहिती अशी की, नांदरखेडा येथील सुरेश मक्कन   पाटील हे शहादा येथे मोटारसायकलीने (क्रमाक एम.एच.39- 0419) ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातून मोटारसायकल चोरी करून गावातच अज्ञात ठिकाणी लपवत डिक्कीमधील मोबाईल चोरून पोबारा करणा:या चोरटय़ाचा प्रय} तालुक्यातील खेडदिगर येथील जागरूक युवकांमुळे फसला. त्या चोराकडून मोबाईल व मोटारसायकल जप्त करण्यात आली.याबाबत मिळालेली माहिती अशी की, नांदरखेडा येथील सुरेश मक्कन   पाटील हे शहादा येथे मोटारसायकलीने (क्रमाक एम.एच.39- 0419) कामानिमित्त आले  होते. त्यांनी मोटारसायकल डॉ.टाटीया यांच्या कार्यालयाजवळ उभी करून डिक्कीतच मोबाईल ठेवून भाजीमंडईत गेले. तेथून परत आल्यानंतर  मोटारसायकल चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी शोधाशोध केली असता मोटारसायकल मिळाली नाही. ही घटना त्यांनी  सामाजिक कार्यकर्ते गिरीश पाटील यांना सांगितली. त्यांनी डिक्कीतील मोबाईल नंबर डायल केले असता लोकेशन खेड व खेतिया परिसरात मिळत होते. पाटील यांनी खेडदिगर येथील काही जागरूक युवकांना ही माहिती दिली. त्यांनी खेतिया येथील मोबाईल दुकानदारांना ही माहिती दिली. दरम्यान, महेश उत्तम पावरा (रा.बहिरपूर, ता.शहादा) हा मोबाईल विकण्यासाठी आल्याचे एका दुकानदाराने त्या युवकांना सांगितले. त्यांनी तात्काळ दुकानावर धाव घेत पावरा यास पकडून खेडदिगर येथे आणले. त्यानंतर गिरीश पाटील यांना चोराला खेडदिगर येथे पकडून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्या चोरास ताब्यात घेत शहादा येथे आणले. पोलिसी खाक्या दाखवताच महेश पावरा याने चोरलेला मोबाईल काढून देत लपवलेली मोटारसायकलही ताब्यात दिली. खेडदिगर येथील जागरूक युवकामुळे दोन तासातच मोटारसायकल चोर जेरबंद झाला. सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल झाला असून तपास स्वप्नील गोसावी करीत आहेत.