शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आमदार पाडवी यांनी अधिका:यांसह दिली सलसाडी आश्रमशाळेस भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 10:44 IST

तळोदा : सलसाडी येथील शासकीय आश्रमशाळेतील मयत विद्याथ्र्याच्या गढीकोठडा येथील घरी आमदार उदेसिंग पाडवी व आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनीषा वर्मा यांनी भेट देऊन त्याच्या पालकांचे सांत्वन केले. या वेळी मयत विद्याथ्र्याच्या आईस शासकीय निधीतून मदत म्हणून दोन लाखांचा धनादेशदेखील देण्यात आला. दरम्यान, आमदार पाडवी यांनी अधिका:यांसह आश्रमशाळेस भेट देऊन ...

तळोदा : सलसाडी येथील शासकीय आश्रमशाळेतील मयत विद्याथ्र्याच्या गढीकोठडा येथील घरी आमदार उदेसिंग पाडवी व आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनीषा वर्मा यांनी भेट देऊन त्याच्या पालकांचे सांत्वन केले. या वेळी मयत विद्याथ्र्याच्या आईस शासकीय निधीतून मदत म्हणून दोन लाखांचा धनादेशदेखील देण्यात आला. दरम्यान, आमदार पाडवी यांनी अधिका:यांसह आश्रमशाळेस भेट देऊन घटनेची माहिती घेतली. घटनेला जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी अधिका:यांना दिल्या.गेल्या सोमवारी तालुक्यातील सलसाडी येथील शासकीय आश्रमशाळेत सहावीत शिकणारा विद्यार्थी सचिन चंद्रसिंग मोरे याचा कुपनलिकेची मोटार सुरू करताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. मयत विद्याथ्र्याच्या गढीकोठडा, ता.तळोदा येथील घरी शुक्रवारी आमदार उदेसिंग पाडवी, आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनीषा वर्मा, नाशिक विभागाचे आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, प्रभारी प्रांताधिकारी विजय भांगरे यांनी भेट दिली. या वेळी उपस्थितांनी मयत सचिनची आई कौशल्याबाई मोरे यांचे सांत्वन केले. याप्रसंगी त्यांना शासकीय मदतीतून मिळालेला दोन लाखांचा धनादेशही आमदार पाडवी यांच्या हस्ते देण्यात आला. शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासनही  आमदार पाडवी यांनी दिले. त्यापूर्वी आमदार पाडवी यांनी आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनीषा वर्मा, आयुक्त रामचंद्र कुलकर्णी यांच्यासह सलसाडी आश्रमशाळेला भेट दिली. त्यांनी विद्याथ्र्याचा ज्या जागी शॉक लागून मृत्यू झाला त्या जागेची पाहणी केली. याशिवाय घटनेची संपूर्ण माहिती शिक्षकांकडून जाणून घेतली. आश्रमशाळेतील व्यवस्थापनाच्या व निष्काळजीपणामुळे दुर्दैवी घटना घडल्याचे दिसून येत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे दोषींवर कडक कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी अधिका:यांना दिल्या. दरम्यान, सचिव वर्मा यांनी सलसाडी गावातील गावक:यांचीही भेट घेऊन त्यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेतली. शाळा सुरळीत करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.या वेळी प्रभारी तहसीलदार रामजी राठोड, सहायक प्रकल्प अधिकारी अशोक तांबोळी, शैलेश पटेल, प्रदीप देसाई, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, लक्कडकोटचे सरपंच जोलू पाडवी, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, फौजदार रमेश वावरे, मंडळ अधिकारी ए.जे. वळवी, कौशल सवाई, सुरेंद्र पाडवी, रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते.आश्रमशाळेत प्रक्षुब्ध जमावाने अधिकारी व पोलिसांना केलेल्या मारहाणीमुळे शाळेतील मुलेही भेदरलेली होती. साहजिकच सर्व 413 विद्याथ्र्याना पालकांनी आपआपल्या घरी नेले होते. त्यामुळे शाळा सध्या विद्यार्थीविना ओस पडली आहे. शुक्रवारी आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनीषा वर्मा व आयुक्त रामचंद्र कुलकर्णी यांनी नवीन इमारतीची पाहणी केली. या वेळी त्यांनी इमारतीत ज्या काही असुविधा आहेत त्या तातडीने पूर्ण कराव्यात. याशिवाय विद्यार्थी संख्येनुसार शौचालये व स्वच्छतागृहे तयार करण्याच्या सूचनाही प्रकल्पाच्या बांधकाम विभागाला दिल्या. त्यानंतर त्यांनी प्रकल्पातील अधिकारी व शाळेच्या कर्मचा:यांची बैठक घेतली. या घटनेत प्रत्यक्ष ज्यांचा सहभाग असेल अशांच्या चौकशीसाठी पोलीस प्रशासनास मदत करा. आता भयमुक्त वातावरणातून बाहेर पडूनदोन-तीन दिवसात शाळा नियमित सुरू करा. यासाठी पालकांच्या गावी जाऊन संबंधित सरपंच, पोलीस पाटील यांच्यासह पालकांची भेट घेऊन विद्याथ्र्याना शाळेत आणण्यासाठी प्रय} करा. या वेळी शिक्षकांनीही त्यांच्यापुढे अडचणी उपस्थित केल्या. त्या तातडीने सोडविण्याच्या सूचनाही त्यांनी अधिका:यांना दिल्या. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून ज्येष्ठ शिक्षिका सुवर्णा सोलंकी तर अधिक्षकाचा कार्यभार के.टी. पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.