शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मिशन ‘शोधमोहिम’ राबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात तब्बल ६० हजार मजूर, विद्यार्थी व नोकरदार परराज्यासह विविध गाव व शहरातून आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात तब्बल ६० हजार मजूर, विद्यार्थी व नोकरदार परराज्यासह विविध गाव व शहरातून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने नव्याने गावोगावी आरोग्य तपासणी मोहिम राबवावी अशी मागणी जिल्ह्यातून जोर धरू लागली आहे. सध्या राज्यात ग्रामिण भागात जेथेही नवीन रुग्ण आढळत आहेत ते सर्व बाहेर गावाहून आलेले असल्याने त्यांच्या संक्रमणापासून इतरांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात येत्या काळात कोरोनाची संख्या स्थिर ठेवायची असेल तर आरोग्य तपासणीला जोर द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.नंदुरबार जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून परराज्य व परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक येत आहेत. यात मजूरांची संख्या सर्वाधिक आहे. त्याखालोखाल विद्यार्थी असून नोकरदार मंडळींची संख्याही बऱ्यापैकी आहे. याशिवाय काहीजण रेड झोनमधून येवून नातेवाईकांकडे राहत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या १५ दिवसात जे कोरोना रुग्ण आढळले ते सर्व बाहेरगावाहून आलेले व त्यांच्या संपर्कातील आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.साथरोग सर्व्हेक्षणात नोंद व्हावीपावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर साथरोग सर्व्हेक्षण होणार आहे. त्यातच कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून परजिल्हा, परराज्यातून आलेल्या नागरिकांचीही तपासणी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर करून घेणे आवश्यक आहे.याबाबत हिवताप विभाग आणि जिल्हा आरोग्य विभाग यांनी संयुक्त नियोजन करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी यांनी देखील याबाबत लक्ष घालावे अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.परत आलेल्यात केवळ स्थलांतरीत मजूर नव्हे तर खाजगी नोकरी व व्यवसायानिमित्त महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील मोठ्या शहरांमध्ये रहिवास करणाºयांचाही समावेश आहे़ आजअखेरीस नंदुरबार तालुक्यात २१ हजार ३७५़ नवापुर तालुक्यात ४ हजार ९२५़ तळोदा तालुक्यात ८ हजार ९११़ शहादा तालुका-७ हजार ३०३़अक्कलकुवा ८ हजार ८६३़ तर धडगाव तालुक्यात ९ हजार ४८५ स्थलांतरीत नागरिकांनी प्रवेश केला होता़ एकूण ६० हजार ८६२ संख्या असलेल्या या नागरिकांच्या क्वारंटाईन केंद्रांसह गावनिहाय स्क्रीनिंग करण्यात आले होते़ अद्यापही परतणाºयांची संख्या वाढत असून त्यांची माहिती घेतली जात आहे़अनेकांचे क्वॉरंटाईन संपलेबाहेर गावाहून आलेल्यांपैकी ज्यांनी प्रशासनाला किंवा आरोग्य विभागाला कळविले त्यांची तपासणी करून होम क्वॉरंटाईन करण्यात आले होते. अशा लोकांचा क्वॉरंटाईनचा कालावधी संपला आहे. तर जे क्वॉरंटाईन होते ते अनेक ठिकाणी बिनधिक्कत बाहेर फिरत होते.अनेकांनी तर प्रशासनाला कळविलेले नाही. यात विद्यार्थ्यांचा सर्वाधिक भरणा आहे. विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी भितीपोटी कळविलेले नाही. त्यामुळे तो धोका कायम आहे.अशा युवकांचा व विद्यार्थ्यांचा शोध घेणेही क्रमप्राप्त ठरणार आहे. याबाबतही प्रशासनाने गांभिर्याने घेणे आवश्यक आहे.स्वॅब तपासणीही गेल्या काही दिवसात थंडावली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १,३१५ जणांची तपासणी करण्यात आली आहे.वास्तविक बाहेरगावाहून आलेल्यांची संख्या ६० हजार तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची संपर्कातील लोकांची संख्या लक्षात घेता स्वॅब तपासणीचा आकडा हा कमीच आहे.