लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रेल्वे आणि बसस्थानकात विशेष दक्षता घेतली जात आहे. रेल्वे स्थानकातील सर्वच ठिकाणी स्वच्छता केली जात आहे. रेल्वेच्या आरोग्य विभागाने बुधवारी येथे पहाणी करून एकुण स्थितीची माहिती घेतली. तसेच खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना सक्त सुचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, बसस्थानकात देखील स्वच्छतेच्या दृष्टीने काळजी घेतली जात आहे. सर्व बसेस नियमित स्वच्छ केल्या जात आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव हा सर्वात जास्त गर्दीच्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता गर्दी होणाºया रेल्वे आणि बसस्थानकांच्या ठिकाणी विशेष काळजी घेण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत. त्यादृष्टीने संबधीत विभाग कामाला लागला आहे.रेल्वे स्थानकात नियमित स्वच्छतेला महत्व दिले जात आहे. दिवसातून तीन वेळा स्वच्छता केली जात आहे. शिवाय प्रवासी सर्वाधिक ज्या ठिकाणी स्पर्श करतात अशा ठिकााणी सॅनिटायझरने स्वच्छता कर्मचारी स्वच्छता करीत आहे. यात बसण्याचे बाक, पादचारी पूल, तिकीट खिडकी, खाद्य पदार्थाचे स्टॉल, पिण्याच्या पाण्याचे नळ, स्वच्छतागृह यांचा समावेश आहे. फलाट फार्मवर कचरा होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे.बुधवारपासून दिवसातून तीन वेळा स्वच्छता करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांना विशिष्ट ड्रेस, मास्क, ग्लोव्हज दिले जात आहे. येणाºया व जाणाºया सर्व प्रवासी गाड्यांमध्ये देखील स्वच्छता केली जात आहे.आरोग्य व स्वच्छता विभागरेल्वेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने बुधवारी रेल्वे स्थानकात भेट देत स्वच्छतेच्या कामांची पहाणी केली. विविध खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर जावून तेथील पदार्थांचा दर्जा, स्वच्छता आणि खाद्यपदार्थ बनविणाºयांच्या आरोग्याची माहिती घेतली. तसेच काही सुचना देखील दिल्या. यावेळी स्टेशन प्रबंधक वसंतलाल मंडल, उपस्टेशन अधीक्षक प्रमोद ठाकुर यांच्यासह रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य जवाहर जैन आदी उपस्थित होते.प्रवासी संख्या रोडावलीरेल्वेची प्रवासी संख्या ३० टक्के रोडावली आहे. याशिवाय स्थानकावर येणाºयांची संख्या देखील कमी झाली आहे. गर्दीवर नियंत्रणासाठी रेल्वेने फ्लॅटफॉर्म तिकिट वाढविले आहे. त्याचाही परिणाम दिसून येत आहे.बसस्थाकावरही दक्षताबसस्थानकातही दक्षता घेतली जात आहे. जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा, अक्कलकुवा येथे स्वच्छतेवर भर दिला जात आहे. सर्वच एस.टी.बसेसची नियमित स्वच्छता केली जात आहे. बसस्थानक आवारातील कचºयाची वेळोवेळी विल्हेवाट लावली जात आहे. प्रवाशांना ध्वनीक्षेपकाद्वारे कोरोना आजाराविषयी आणि त्याविषयी दक्षता बाळगण्यासंदर्भात सुचना दिल्या आहेत.रेल्वेचा कचरा आतापर्यंत पालिकेच्या घंटागाड्यांमध्ये भरला जात होता. रेल्वेच्या स्वच्छता विभागाने गोळा केलेला सर्व कचरा हा स्थानकाबाहेर असलेल्या कचरा कुंडीत टाकला जात होता. तेथून पालिकेचे घंटागाडीवरील कर्मचारी दररोज सकाळी नियमितपणे हा कचरा उचलत होते. परंतु सध्या रेल्वे स्थानक इमारतीचे काम सुरू आहे. या ठिकाणची कचराकुंडी काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे गोळा केलेला कचरा प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये भरून ते स्थानकाच्या बाहेर ठेवले जात आहे. तो कचरा घंटागाडी उचलत नसल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणने आहे. स्टेशन प्रबंधक यांनी याबाबत पालिकेला तीन वेळा पत्र दिले आहे. परंतु पालिकेच्या म्हणण्यानुसार पालिकेची जबाबदारी स्थानकातील कचरा उचलण्याच नाही, केवळ स्थानकाबाहेरील कचरा कुंडीमधील कचरा उचलण्याची आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या भिंतीलगत कचरा भरलेल्या गोण्यांचा ढिग पडला आहे.
रेल्वे स्थानकात मिशन ‘क्लिनअप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:18 IST