शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

म्हसावद शिवारात बिबटय़ा दिसल्याने मजुरांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : बुडीगव्हाण रस्त्यावर म्हसावद शिवारात कापसाच्या शेतात बिबटय़ाने कोल्हा फस्त केल्याची घटना घडली. या शेतात मजूर कापसाची वेचणी करीत असताना अचानक समोर बिबटय़ा आल्याने महिला मजुरांची धावपळ उडाली.याबाबत वृत्त असे की, सोमवारी सकाळी नऊ वाजता बुडीगव्हाण रस्त्यालगत म्हसावद शिवारात बाबू ओंकार चौधरी, हेमराज बाबू चौधरी यांच्या शेतात ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : बुडीगव्हाण रस्त्यावर म्हसावद शिवारात कापसाच्या शेतात बिबटय़ाने कोल्हा फस्त केल्याची घटना घडली. या शेतात मजूर कापसाची वेचणी करीत असताना अचानक समोर बिबटय़ा आल्याने महिला मजुरांची धावपळ उडाली.याबाबत वृत्त असे की, सोमवारी सकाळी नऊ वाजता बुडीगव्हाण रस्त्यालगत म्हसावद शिवारात बाबू ओंकार चौधरी, हेमराज बाबू चौधरी यांच्या शेतात कापूस वेचणी सुरू होती. कापूस वेचणी सुरू असताना शेताच्या मध्यभागी आल्यावर अचानक बिबटय़ा मांस खाताना मजुरांना दिसला. त्याला पाहून महिला मजुरांनी आरडाओरड करीत पळ काढला. बिबटय़ाही तेथून  उसाच्या शेतात घुसला. बिबटय़ाने कोल्ह्याची शिकार करून त्याचे मांस या शेतात खात असताना मजुरांना दिसला. रविवारी रात्रीही शेतमालकास बिबटय़ा शेताच्या बांधावर दिसला होता तर 15 दिवसांपूर्वी राजाराम नथ्थू पाटील हे पहाटे व्यायामासाठी गेले असता रस्त्यालगत पपईच्या शेताच्या बांधावर दिसला होता.या परिसरात बिबटय़ाचे वास्तव्य असताना वनविभाग मात्र सुस्त  झाला आहे. 15 दिवसांपासून एकाच ठिकाणी आढळून येत असलेल्या बिबटय़ाचा बंदोबस्त करतील की मानवी बळी घेण्याची वनविभाग वाट पाहत आहे, असा संतप्त सवाल शेतक:यांनी उपस्थित केला आहे.