शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरामुळे खोडसगाव पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नेहमीच गजबजणारे खोडसगाव ता. नंदुरबार येथील बहुतांश नागरिक रोजगारानिमित्त परराज्यात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नेहमीच गजबजणारे खोडसगाव ता. नंदुरबार येथील बहुतांश नागरिक रोजगारानिमित्त परराज्यात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या गावात शुकशुकाट दिसून येत आहे.नंदुरबार तालुक्यातील खोडसगाव या गावात तसे विविध समाजाचे वास्तव्य आहे. असे असले तरी तेथे नेहमीच सौख्याचे वातावण दिसून येते. शिवाय समाज अथवा जातीचा कुठलाही विचार न करता एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका प्रत्येक समाज बांधव पार पाडत आहे. हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने फारसे मोठे नसून तेथील लोकसंख्या एकुण एक हजार ३६१ असल्याचे आढळून आले आहेत. तत ७०३ पुरुष तर ६५८ महिलांचा समावेश आहे.खोडसगाव परिसरात काही प्रमाणातील शेतीची कामे वगळता अन्य कुठलीही कामे नसल्यामुळे तेथील मजूरांना स्थानिक ठिकाणी वेळेवर व अपेक्षेनुसार रोजगार मिळत नाही, तर दुसऱ्या बाजूने गुजरातमध्ये निश्चितच रोजगार मिळतो शिवाय तो रोजगार समाधानकारकही असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे खोडसगाव येथील बहुसंख्य मजूर सौराष्टÑात स्थलांतरीत झाले आहेत. परिणामी खोडसगाव येथे सद्यस्थितीत शुकशुकाट दिसून येत आहे. नेहमीच गजबजणाºया या गावात प्रत्येक गल्ल्यांमध्ये ठराविकच नागरिक दिसून येत आहे. हे नागरिक घराचा सांभाळ करण्यासाठी तसेच काही पशुधनाच्या सेवेसाठी थांबल्याचे सांगण्यात आले.सौराष्टÑात आॅक्टोबरमध्ये भूईमुगच्या शेंगा काढण्यात येत होत्या. त्यानंतर भात कापणीला सुरुवात झाली. भात कापणीचा हंगाम आटाक्यात आला असतानाच पुन्हा कापूस वेचणीला सुरुवात झाली. त्यामुळे तेथे रोजगार सहजच उपलब्ध होत असल्याचे म्हटले जात आहे. कापूस वेचणीशिवाय गुजरातमध्ये ऊसतोड कामासाठी देखील अपेक्षेनुसार रोजगार उपलब्ध होत आहे. त्यामुळे खोडसगाव येथील मजूर तेथे स्थलांतरीत झाल्याचे म्हटले जात आहे.खोडसगावसह त्या परिसरातील अन्य गावांमधूनही बहुसंख्य मजूर स्थलांतरीत झाल्याचे आढळून आले आहे. या परिसरातील नागरिकांच्या या स्थलांतरामुळे शासनाकडूनही रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला नसावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. अशा स्थलांतरामुळे या मजूर बांधवांमध्ये काही समस्या निर्माण होतात. अशा समस्यांमधून या मजूरांची सुटका करण्यासाठी किंवा समस्याच उदघभवू नये, यासाठी प्रशासनामार्फत विशेष काळजी घेणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन स्थरावरुन याबाबत कुठल्या उपययोजना करण्यात येतात, याकडे लक्ष लागले आहे.खोडसगाव येथे जिल्हा परिषदेची मराठी शाळा सुरू करण्यात आली असून सद्यस्थितीत तेथे पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू आहे. तेथे एकुण १८४ विद्यार्थी असल्याचे आढळून आले आहेत. एकुण विद्यार्थ्यांपैकी गुजरातमध्ये स्थलांतरीत झालेल्या पालकांसोबत १४ विद्यार्थी देखील स्थलांतरीत झालेत. परंतु हे विद्यार्थी अधूनमधून त्यांच्या अजी-आजोबांकडे परत येतही असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्थलांतरीत झाले असले तरी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत नसल्याचे स्पष्ट होत आहे.