शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

म्हसावदची केळी सातासमुद्रापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 13:13 IST

तंत्रशुद्ध पद्धतीने पॅकींग : आधुनिक तंत्रज्ञान व परिश्रमाची जोड; केळीची परदेशात निर्यात

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 7 : म्हसावद, ता.शहादा येथील केळी प्रथमच इराण, इराक व दुबईला पोहोचणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान व परिश्रमाच्या जोरावर म्हसावद येथून केळीची निर्यात सातासमुद्रापार झाली आहे.येथील प्रगतीशिल शेतकरी विठ्ठल हिरजी चौधरी, रमाकांत चौधरी यांनी जी-नऊ जातीच्या केळीची सहा एकरात लागवड केली आहे. या वेळी आधुनिक कृषी तंत्रज्ञानासह परिश्रम व कृषीतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केळीचे चांगले उत्पादन घेतल्याचे सांगितले. दरम्यान, प्रत्यक्षात क्षेत्रावर भेट दिली असता निर्यात होणारी केळी तंत्रशुद्ध पद्धतीने भरली जात होती. केळी क्षेत्रातून घड कापून आणल्यावर स्वच्छता करणे, निकामी भाग काढून जमिनीला न टेकता विशिष्ट मिश्रण केलेल्या द्रावणात बुडवून हवाबंद पिशवीत केळीची पॅकींग केली जात होती. ही केळी इराण, इराक व दुबईला पोहोचण्यासाठी 35 ते 45 दिवस लागतात. त्या दरम्यान केळी पिकत नाही. जशीच्या तशी ताजी राहते. यासाठी ही प्रक्रिया आवश्यक असल्याचे मुंबई सटस् अॅग्रोटेकचे मॅनेजर अखिलेश पाटील यांनी सांगितले. येथून केळी बारामती येथील कोल्ड स्टोरेजमध्ये पाठविण्यात येणार असून, तेथून मुंबई येथे पाठविली जाते. त्यानंतर समुद्र मार्गाने दुबई, इराक व इराण याठिकाणी केळीची निर्यात होणार असल्याचे सांगितले.ब्राrाणपुरी येथील डिगंबर पाटील, सुलवाडे येथील अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माल निर्यात होत असल्याचे संबंधितांनी सांगितले. सरासरी 900 ते एक हजाराचा भाव देवून अधिक फरक मिळत असून, 12 टन माल निर्यात करण्यात आला.