शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

म्हसावदला पावणेदोन लाखांचा बोगस बीटीचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 17:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : येथील एका घरगुती कृषी केंद्रावर गुरूवारी संध्याकाळी गुणनियंत्रण विभागामार्फत धाड टाकून एक लाख 72 हजार 50 रुपये किंमतीचे बोगस आर.आर. बीटी कापूस बियाणे जप्त करण्यात आले. याप्रकरणी म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसावद भागात बोगस बियाणे विक्री सुरू असल्याची  माहिती मिळाल्यानुसार जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अरूण ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : येथील एका घरगुती कृषी केंद्रावर गुरूवारी संध्याकाळी गुणनियंत्रण विभागामार्फत धाड टाकून एक लाख 72 हजार 50 रुपये किंमतीचे बोगस आर.आर. बीटी कापूस बियाणे जप्त करण्यात आले. याप्रकरणी म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसावद भागात बोगस बियाणे विक्री सुरू असल्याची  माहिती मिळाल्यानुसार जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अरूण श्रीराम तायडे (रासायनिक खते / बियाणे) यांचेसह पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने चिखली फाटय़ाजवळ एका घरगुती केंद्रावर धाड टाकण्यात आली तेव्हा दुकानदार पोपट पाशा मालवीय हे गुजरातला कामानिमित्त गेले होते. महिला पोलीस कर्मचारी शीतल धनगर यांनी मालवीय यांची प}ी रेखाबाई मालवीय यांना छापा टाकण्यात येत असल्याचे सांगून कारवाई सुरू करण्यात आली. यात वेगवेगळ्या कंपनीची बोगस कापूस बियाण्यांची पाकीटे जप्त करण्यात आली. (कंसात पाकीटची संख्या दिली आहे.) महाधन 155 (31), महाधन 255 (25), महाधन 501 (आठ), महाधन लिलक (15), गोपाल 155 (36), गोपाल 444 (30), हविशा नऊ (14), गोपी 155 (23), गोपाल बीजीट (एक), महाधन बिग बॉल (दोन) अशी 185 पाकीटे जप्त करण्यात आली. प्रत्येक पाकीटाची किंमत 930 रुपयांची असून, एकूण एक लाख 72 हजार 50 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. प्रत्येकी पाकीटातून तीन नमुने काढून एच.टी.बी.टी. तपासणीसाठी सीलबंद करण्यात आले आहे. हे बोगस बियाणे गुजरात राज्यात तणनाशक बीटी कापूस बियाणे म्हणून विक्री करण्यात येत असते. गेल्या वर्षी खेडदिगर येथे बोगस बियाणे विक्री करून शेतक:यांची फसवणूक करण्यात आली होती. जिल्हा कृषी अधिकारी एम.एस. पन्हाळे, शहादा उपविभागीय कृषी अधिकारी मोहन सोमा रामोळे, गुणनियंत्रण निरीक्षक अरूण श्रीराम तायडे, शहादा तालुका कृषी अधिकारी प्रविण विठ्ठल भोर, मंडळ कृषी अधिकारी वसंत हरी मराठे, कृषी सहाय्यक कृष्णा इंदासराव निकुंभे यांच्यासह म्हसावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश चौधरी, राजेंद्र काटके, अनिल पावरा, शीतल धनगर यांनी धाड टाकली.बोगस बियाणे विक्रीबाबत जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अरूण तायडे यांनी म्हसावद पोलिसात फिर्याद दिल्यानुसार पोपट पाशा मालवीय यांच्या विरोधात म्हसावद पोलिसात जीवनावश्यक वस्तु सेवा कायदा 1955 चे कलम तीन, नऊ चे उल्लंघन, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 च्या खंड प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून, म्हसावद पोलीस तपास करीत आहेत.