शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

म्हसावद-सुलतानपूर रस्ता दुरवस्थेने वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 17:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : शहादा तालुक्यातील म्हसावद ते सुलतानपूर रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून वाहन चालवावे कसे? असा ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : शहादा तालुक्यातील म्हसावद ते सुलतानपूर रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून वाहन चालवावे कसे? असा प्रश्न वाहन चालकांना निर्माण झाला आहे. डांबरीकरण रस्ताच गायब झाला असून मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले असून या रस्त्याची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील जनतेने केली आहे.मध्यप्रदेश राज्याला जोडणारा म्हसावद भागातून हा एकमेव रस्ता आहे. पावसाळा संपण्यापूर्वी दरा फाटा ते खेतिया रस्त्याचे रुंदीकरण सुरू असल्याने त्या रस्त्याची वाहतूक म्हसावद-सुलतानपूर या रस्त्याने वळविण्यात आली होती. एकेरी असलेला हा रस्ता अवजड वाहनांमुळे पूर्णत: उखडून गेला असून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. डांबरीकरणाचा रस्ता मातीचा बनला आहे. उंचवटे आणि खड्डे यामुळे वाहनचालकाला वाहन चालवावे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन महिन्यापासून रस्त्याची दुरूस्ती न केल्यामुळे रस्ता उखडून मातीचा झाल्याने धूळ ऊडते. ऊस-कापूस भरून जाणारी वाहने खड्डे व उंचवटे यामुळे उलटून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे-झुडपे वाढून रस्ता अरूंद व एकेरी झाला आहे. मात्र रस्त्याच्या दुर्दशेकडे संबधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. रस्त्याची दुरूस्ती करून नव्याने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी जनतेने केली आहे.