शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
2
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
3
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
4
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
5
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
6
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
7
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
8
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
9
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
10
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
11
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
12
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
13
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
14
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
15
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
16
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
17
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
18
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
19
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
20
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा

मंदिर ट्रस्टी व पोलीस अधिकाºयांची प्रकाशा येथे बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : श्रावण महिना, कानुमाता उत्सव, दशामाता मूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी व प्रकाशा येथील मंदिरांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : श्रावण महिना, कानुमाता उत्सव, दशामाता मूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी व प्रकाशा येथील मंदिरांचे ट्रस्टी, संचालकांची येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत नियोजन करण्यात आले. दरम्यान, ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन असल्याने मंदिर उघडण्याचा प्रश्नच येत नाही, असे पोलीस प्रशासाकडून बैठकीत सांगण्यात आले.प्रकाशा येथील सद्गुरू धर्मशाळेत गुरुवारी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला केदारेश्वर मंदिराचे मुख्य विश्वस्त रामचंद्र पाटील, सद्गुरू धर्मशाळेचे अध्यक्ष मोहन चौधरी, संगमेश्वर मंदिराचे संचालक हरी पाटील, काशीविश्वेश्वर मंदिराचे अध्यक्ष दिलीप पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जयगणेश पाटील, किशोर चौधरी, पं.स. सदस्य जंग्या भिल, ग्रा.पं. सदस्य अरुण भिल, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील, तलाठी धर्मराज चौधरी, केदारेश्वर मंदिराचे संचालक सुरेश पाटील, नंदकिशोर पटेल, मनोज सोनार, हवालदार गौतम बोराळे, सुनील पाडवी, पंकज जिरेमाळी आदी उपस्थित होते.पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले की, दशामाता मूर्ती विसर्जन व श्रावणमास लक्षात घेता येथे भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी मंदिर ट्रस्टींची ही बैठक घेतल्याचे सांगून शासन नियमांची माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी कोरोनाच्या पार्र्श्वभूमीवर सर्वत्र ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे मंदिर उघडण्याच्या संबंधच नाही. श्रावण महिना सुरू झाल्याने परगावाहून भाविक येथे दशामाता, कानुमाता विसर्जनासाठी येण्याची शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शासनाच्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. कारण शहादा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत. त्यामुळे भाविकांच्या श्रद्धेचा आदर करत, दशामाता मूर्ती विसर्जनासाठी भाविकांनी येथे येऊ नये. जर आलेच तर त्यांना सोशल डिस्टंन्सिंगमध्येच सोडण्यात येईल. तसेच प्रत्येकाच्या तोंडावर मास्क असणे आवश्यक आहे. मंदिर परिसरात बॅरिकेटींग लावले जाईल, अनावश्यक फिरणाऱ्यांची चौकशी केली जाईल. तसेच मंदिर ट्रस्टींनी थर्मल स्कॅनिंग उपलब्ध करून येणाºया भावीकांचे थर्मल स्कॅनिंग करावे, असे त्यांनी सांगितले.रामचंद्र पाटील व हरी पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने सूचना मांडल्या. जिल्हाबंदी असल्याने परजिल्ह्यातील भाविक येणार नाहीत. आलेच तर शासनाचा नियमांचे जे पालन करतील त्यांना मूर्ती विसर्जनासाठी पाठवावे. गावात यंदा कानुमाता स्थापना नसल्यासारख्याच आहेत. जर झाल्याच तर त्या कमी असतील त्यामुळे विसर्जन ठिकाणी गर्दी होणार नाही. मात्र दशामाता मूर्ती विसर्जनाला नेहमीची गर्दी लक्षात घेता कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी नियमांचे पालन होणे आवश्यक आहे, असे सांगितले. बैठकीनंतर पोलीस अधिकारी व मंदिर पदाधिकाऱ्यांनी मंदिर परिसर, तापी नदी घाट, पाण्याची पातळी, मूर्ती विसर्जनाचे ठिकाण आदींची पाहणी केली.