शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या घटना रोखण्यासाठी शहादा येथे बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 12:45 IST

शहादा : शहरातील एनआरआय व्हीला, मलोणी शिवार व नवीन वसाहतींमध्ये चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

शहादा : शहरातील एनआरआय व्हीला, मलोणी शिवार व नवीन वसाहतींमध्ये चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या उपस्थितीत महसूल व पोलीस प्रशासनाची येथे बैठक घेण्यात येऊन उपाययोजना आखण्यात आल्या.बैठकीला प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, डीवाय.एस.पी. महारू पाटील, तहसीलदार मनोज खैरनार, पोलीस निरीक्षक संजय शुक्ल, भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ.किशोर पाटील, शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाळे, अतुल जयस्वाल, लक्ष्मीकांत वसावे, एनआरआय व्हीलाचे संचालक शरद पाटील व परिसरातील वसाहतींमधील नागरिक उपस्थित होते. बैठकीत आमदार पाडवी म्हणाले की, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले व परतीच्या पावसानेही निराशा केल्याने खरीप हंगाम शेतक:यांच्या हातातून गेला आहे. या परिस्थितीचे भविष्यात वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. घरफोडी, चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी जनता व पोलिसांमधील समन्वय आवश्यक आहे. दोघांनी एकमेकांना सहकार्य केले तर या घटनांना निश्चितच आवर घालता येऊ शकणार आहे. नागरिकांनी आपल्या वसाहतीत वस्तू विक्री करणारे, भंगार विक्रेते व अज्ञात व्यक्तीबाबत संशय आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे सांगितले. डीवाय.एस.पी. पाटील म्हणाले की, पोलीस व जनता यांच्यातील संपर्क व संवाद चोरीच्या तसेच गुन्हे घातपाताच्या घटना थांबवू शकतो. जनतेचे संरक्षण हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य असून जनतेनेही पोलिसांना सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. पोलीस निरीक्षक शुक्ल म्हणाले की, येणा:या काळात चोरीच्या घटनांना आवर घालण्यासाठी सर्वानी जागरुक राहणे गरजेचे आहे. शहराची भौगोलिक परिस्थिती पाहता चारही बाजूंनी रस्ते असल्याने रस्ता बंद करणे अवघड होते. येत्या काळात शहरातील नवीन वसाहतींमध्ये ग्रामसुरक्षा दल तयार करण्याची गरज आहे. ज्या वसाहती ग्रामसुरक्षा दल तयार करतील त्यांना एक पोलीस काठी, एक बॅटरी व शिटी दिली जाणार असल्याचे शुक्ल यांनी सांगितले.बैठकीला एनआरआय व्हीला, शारदा कॉलनी, तराई पार्क, ड्रीम सिटी, आयोध्यानगरी, ओमशांतीनगर यासह परिसरातील वसाहतीतील नागरिक उपस्थित                  होते. सूत्रसंचालन प्रा.रमेश पाटील यांनी तर आभार शरद पाटील यांनी मानले.