शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

विरोधी गटातील नगरसेवकांचा सभात्याग : नवापूर पालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 12:22 IST

सूचविलेले विषय अजेंडय़ावर न घेतल्याने नाराजी

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 28 : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी गटातील नगरसेवकांनी सूचविलेल्या विकास कामांचे विषय सभेच्या अजेंडय़ावर घेण्यात न आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही सदस्यांनी साप} वागणुकीचा आरोप करीत सभात्याग केला. विरोधकांचा हा आरोप मात्र सत्ताधा:यांकडून फेटाळण्यात आला. पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा हेमलता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. लोकहिताच्या अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी   राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना नगरसेवकांनी विविध विषय सूचविले होते. सभा सुरू झाल्यावर विषय सूचीवर आपण सूचविलेल्या विकास कामांच्या विषयांना या सूचित स्थान मिळाले नसल्याचे लक्षात आल्यानंतर  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नरेंद्र नगराळे, मीनल लोहार, खलील खाटीक व सविता नगराळे यांनी विरोधकांच्या विषयांना डावलून सत्ताधारी गट भेदभाव करीत असल्याचा आरोप करून सभात्याग केला व नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या नगरसेविका अरूणा पाटील यांनीही लोकहिताचे विषय सूचविले असताना त्यालाही बगल दिल्याचा आरोप करून आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. यावर नगराध्यक्षा हेमलता  पाटील यांनी गेल्या तीन महिन्यात केवळ दोन सर्वसाधारण बैठक झाल्या. त्यात प्रथम बैठकीत सर्वच्या सर्व 22 नगरसेवकांनी 107 विषय सूचविले. पैकी 42 विषयांना विषय सूचित स्थान देण्यात आले. या बैठकीसाठी सूचविण्यात आलेल्या एकूण 177 विषयांपैकी 30 विषयांची निवड केली असून पालिकेकडे उपलब्ध योजना व निधी पाहता  विषय सूची निश्चित केल्याचे   हेमलता पाटील यांनी सांगून विरोधकांना समजाविण्याचा प्रय} केला. सर्व नगरसेवकांनी सूचविलेले सर्वच विषय एकाच बैठकीत घेणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट करुनही विरोधी गटातील सदस्यांनी सभात्याग केला. शहरातील महादेव मंदिराच्या सरंक्षण भिंतीसह काही विकास कामासंदर्भात पालिका व सत्ताधारी गट उदासीन आहे की काय? म्हणून बैठक संपल्यावर अरूणा पाटील यांनी नगराध्यक्षा हेमलता पाटील यांच्याशी या विषयावर चर्चा केली. जुन्या महादेव मंदिरालगतच्या रस्त्याच्या कामावेळी संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे सरंक्षण भिंत खचून पूर्ण नामशेष झाली आहे. मंदिराच्या  संरक्षण भिंतीची पुनर्बाधणी व सुशोभिकरण, दशक्रीया विधी घाट व तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध होणे हा जनतेचा श्रद्धा व आस्थेचा विषय असल्याने हे काम प्राधान्याने करुन मिळावे, असे  अरूणा पाटील यांनी पटवून दिले. नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी पुढील सर्वसाधारण सभेत या विषयांना स्थान दिले जाईल, असे सांगितले.