लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : अक्कलकुवा शहरातील पोलीस कर्मचारी वसाहतीत यापूर्वीच पॉझिटीव्ह आढळलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील ७५ वर्षीय महिला व १६ वर्षीय पुरूषांची कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे पोलीस वसाहतीत निर्जंतुकीकरण करण्यात आले. दरम्यान, बुधवारी पॉझिटीव्ह आलेल्या रूग्णांना यापूर्वीच खापर येथील विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले होते.मोलगी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या व अक्कलकुवा येथील पोलीस कर्मचारी वसाहतीत राहणाºया एका पोलीस कर्मचाºयाचा तपासणी अहवाल यापूर्वीच पॉझिटीव्ह आला होता. त्याच्या संपर्कातील त्याचे कुटुंबियांमधून ७५ वर्षीय महिला व १६ वर्षीय पुरूष ६ जुलै रोजी पॉझिटीव्ह आढळले असल्यामुळे अक्कलकुवा येथील पोलीस कर्मचारी वसाहतीत ग्रामपंचायतीमार्फत निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.अक्कलकुवा येथील पोलीस कर्मचारी वसाहतीत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांमध्ये वाढ होत असल्याने शहरासह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या वेळी पोलीस कर्मचारी वसाहतीमागील भिमनगर व एकलव्य नगर याठिकाणीदेखील निर्जंतुकीकरण केले जाणे गरजेचे आहे. परंतु याठिकाणी अद्यापपर्यंत निर्जंतुकीकर करण्यात आले नसल्याने प्रशासनाच्या याकृतीबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीनेदखल घेत भिमनगर व एकलव्य नगर येथेही निर्जंतुकीकरण करावे, अशी मागणी आहे. दरम्यान पोलीस वसाहत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर झाली असताना या झोनमधील काही कर्मचारी शासकीय नियमांचे पालन करीत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे.
अक्कलकुवा पोलीस वसाहतीत उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 12:42 IST