शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सफार्मरचे नुकसान करून साहित्याची चोरी

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: August 19, 2017 12:33 IST

मंदाणे परिसरात खळबळ : अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देमोठय़ा टोळीची शक्यता ट्रान्सफार्मरसारखी अवजड वस्तू असताना हा प्रकार करण्याचे धाडस कोणी एकटा चोरटा करणार नाही. या प्रकारावरून आठ ते दहा जणांची सराईत टोळी असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींचा शोध लावून अशाप्रकारे शेतातील अवजारे, व

लोकमत न्यूज नेटवर्कमंदाणे : शहादा तालुक्यातील मंदाणे शिवारातील पाणीपुरवठय़ासाठी कार्यान्वित असलेल्या ट्रान्सफार्मरचे अज्ञात चोरटय़ांनी नुकसान करून त्यातील 15 हजार रुपयांचे ऑईल व कॉईल चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रानुसार, मंदाणे गावात  पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीची भोंगरा रस्त्यालगत स्वतंत्र विहीर व कुपनलिका आहे. यासाठी गुलाबराव ङिापा पवार यांच्या शेताजवळ स्वतंत्र ट्रान्सफार्मर कार्यान्वित करण्यात आला आहे. गुरूवार, 17 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी खांबावरून ट्रान्सफार्मरवरच्या तारा तोडून खाली उतरविला व ट्रान्सफार्मर उघडून ऑईल जमिनीवर फेकून दिले व ट्रान्सफार्मरमधील तांब्याची कॉईल असलेला गड्डा तोडून तो चोरून नेला. यात ट्रान्सफार्मरमधील विद्युत साहित्याचे नुकसान केले. यामुळे चोरीस गेलेल्या मुद्देमालासह एकूण 15 हजारांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.याप्रकरणी मंदाणे येथील वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता विकास पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरटय़ांविरूद्ध चोरी व नुकसानीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार धनराज जाधव करीत आहेत.