नंदुरबार : शहरातील मोठा मारुती चौक परिसरातून अल्पवयीन युवतीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेले़ ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाजता घडली़श्रॉफ हायस्कूलमध्ये अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन युवतीला तिचे पालक शाळेच्या गेटवर शुक्रवारी सकाळी सोडून गेले होते़ दरम्यान दुपारी मुलगी घरी न आल्याने त्यांनी शाळेत तपास केला असता ती शाळेत आलीच नसल्याचे समजले त्यांनी नातलगांकडे शोध घेत माहिती घेतली परंतू ती मिळून आली नाही़ युवतीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल आहे़
मारुती चौक परिसरातून अल्पवयीन युवतीस पळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:34 IST