लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : तापी पुलावरून शहादा येथील युवकाने उडी मारल्याने तो वाहून गेल्याची घटना सारंगखेडा येथे रविवारी रात्री साडेआठ वाजता घडली. युवकाचा रात्री उशीरार्पयत शोध लागला नव्हता. सोहिल सरफराज तेली (20) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. सोहेल व जुबेर हे दोन्ही मित्र त्यांच्या दुचाकीने सारंगखेडा येथे आले. तापी पुलावर दुचाकी उभी करून सोहेल याने मोबाईल लावला. जुबेर याला तुङया घरचा फोन आहे असे सांगून त्याच्याकडे फोन दिला. फोन दिल्यानंतर काही कळायचा आत सोहेल याने पुलावरून उडी मारली. त्यामुळे घाबरून गेलेल्या जुबेर याने आरडाओरड केली. सध्या सारंगखेडा बॅरेजचे चार गेट उघडल्याने तापी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे सोहेल याचा शोध रात्री उशीरार्पयत लागू शकला नाही. नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. त्याने कशामुळे हा प्रकार केला याची माहिती जुबेरसह त्याच्या नातेवाईकांकडून पोलीस घेत होते.
शहाद्याच्या युवकाची सारंगेखडा पुलावरून उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 12:27 IST