शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातील जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 12:25 IST

नंदुरबार आगाराच्या 320 फे:या रद्द नंदुरबार : संततधार पावसामुळे गत दोन दिवसांपासून एसटीला सक्तीची विश्रांती मिळाली आह़े नंदुरबार बसस्थानकातून ...

नंदुरबार आगाराच्या 320 फे:या रद्दनंदुरबार : संततधार पावसामुळे गत दोन दिवसांपासून एसटीला सक्तीची विश्रांती मिळाली आह़े नंदुरबार बसस्थानकातून सुटणा:या बसेसच्या 320 फे:या गुरुवार आणि शुक्रवारी रद्द करण्यात आल्या़ नंदुरबार येथून केवळ धुळे मार्गावर दोन दिवसांपासून बसेस सुरु आहेत़ जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली होती़ गुरुवारी सकाळपासून ठिकठिकाणी पाणी साचून रस्ते बाधित झाले होत़े नंदुरबार ते शहादा, तळोदा, अक्कलकुवा, नवापुर मार्गावर वाहतूक बंद झाली होती़ गुरुवारी दुपारनंतर बसेस सुटू शकल्या नाहीत़ यातून गुरुवार दुपार ते शुक्रवारी दिवसभरात 320 फे:या रद्द करण्यात आल्याची माहिती आह़े गुरुवारी लांब पल्ल्याच्या मार्गावर होणा:या 100 फे:या रद्द झाल्या होत्या़ यातून 9 हजार 730 किलोमीटर प्रवास रद्द झाला़ ग्रामीण मार्गावर गत दोन दिवसात 220 फे:या रद्द करण्यात आल्या आहेत़ यातून 4 हजार किलोमीटर प्रवास रद्द झाल्याची माहिती देण्यात आली आह़े नंदुरबार आगारातून सुटलेल्या सर्व बसेस गुरुवारीच बोलावण्यात आल्या होत्या़ यातील केवळ दोन बसेस माघारी राहिल्या होत्या़ यातील नंदुरबार आगाराची पंढरपूर बस ही टेंभूर्णी जि़ अहमदनगर येथे थांबवण्यात आली आह़े तर खापर ते नंदुरबार ही बस शुक्रवारी सकाळीच परत आली होती़ गुजरात राज्यात जाणा:या बसेस दोन दिवसांपासून आगारात थांबून असल्याची माहिती आगारप्रमुख मनोज पवार यांनी दिली आह़े नंदुरबार आगारातील 100 बसेस थांबून आहेत़ आगारातील 220 चालक आणि 230 वाहक सतर्कता म्हणून आगार मुख्यालयी थांबवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान शुक्रवारी सायंकाळी नंदुरबार ते नाशिक ही बस सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े पाऊस पूर्णपणे ओसरल्यानंतर बसेस सोडण्यात येणार आहेत़ दोन दिवस बंद असलेल्या बसेसमुळे तातडीने प्रवास करुन इच्छिणा:या तसेच दैनंदिन प्रवास करणा:यांचे हाल झाल़े  खाजगी प्रवासी वाहनातून धोकेदायकरित्या प्रवासी वाहतूक सुरु असल्याचे दिसून आल़े शहादा बसस्थानक ठप्प शहादा बसस्थानकातून दरदिवशी लांब, मध्यम आणि ग्रामीण मार्गावर 632 फे:या करण्यात येतात़ गत दोन दिवसांपासून या फे:याच होऊ शकलेल्या नसल्याची माहिती देण्यात आली़ दोंडाईचा रोडवरील भेंडवा नाल्याचे पाणी ओसरत नसल्याने धुळ्याकडे जाणा:या बसफे:या रद्द करण्यात आल्या़ नंदुरबार, तळोदा, प्रकाशा, धडगाव, अक्कलकुवा तसेच लांब पल्ल्याच्या बसेस थांबवण्यात आल्या होत्या़ शुक्रवारी सायंकाळी 12 फे:या पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े ग्रामीण भागातील बसेस सायंकाळी सोडण्यात आल्या होत्या़ तळोदा आगारात भोजनाची सोय  वरखेडी नदीच्या पुरामुळे गुजरात राज्याकडे जाणा:या बसेस तळोदा बसस्थानकात थांबवण्यात आल्या होत्या़ याठिकाणी जळगाव, औरंगाबाद, शिरपूर, अहमदाबाद, बडोदा, सुरत, अक्कलकुवा व धुळे आगाराच्या बसेस थांबून होत्या़ बसेसच्या चालक आणि वाहकांची तळोदा बसस्थानकाचे नियंत्रक व्ही़डी़जावरे, वाहक क़ेआऱ साठे यांनी सोय करुन देत त्यांना भोजन उपलब्ध करुन दिल़े तळोदा बसस्थानकात महाराष्ट्रातील विविध आगारांच्या एकूण 13 व गुजरात राज्यातील 5 बसेस अद्यापही थांबून आहेत़ शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता अक्कलकुव्याकडे जाणा:या बसेस सोडण्यात आल्याची माहिती आह़े तळोदा बसस्थानकातील पाहुणचाराने विविध आगारांचे चालक आणि वाहक भारावले होत़े दरम्यान अक्कलकुवा व तळोदा बसस्थानकात अडकलेल्या गुजरात राज्यातील बसेस निझर मार्गाने वळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़े