लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणावेत म्हणून सासरच्यांनी विवाहितेचा छळ केल्याची घटना दलवाडे ता़ शिंदखेडा येथे घडली़ पुसनद ता़ शहादा येथील माहेर असलेल्या विवाहितेने पोलीसात फिर्याुद दिली आह़े ज्ञानेश्वरी योगेश बोरसे असे विवाहितेचे नाव आह़े डिसेंबर 2016 पासून पुसनद येथील माहेरुन ट्रॅक्टर खरेदीसाठी 2 लाख रुपये आणावेत यासाठी त्यांचा पती योगेश भगवान बोरसे, सासू शोभाबाई व सासरे भगवान दामू बोरसे यांच्याकडून छळ सुरु होता़ 2 लाख देत असाल तर मुलीला नांदवण्यासाठी पाठवा अन्यथा घेऊन जा, अशा धमक्या देत शिवीगाळ करण्यात आली होती़ याप्रकरणी विवाहितेने सारंगखेडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पती योगेशसह सासू व सास:यांविरोधात गुन्हा दाखल आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक जगताप करत आहेत़
ट्रॅक्टरसाठी पैसे हवेत यासाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 12:48 IST