शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

चिंचेच्या हंगामामुळे सातपुड्यात मिळतोय अनेकांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 11:59 IST

उत्पन्नाचे साधन : दर्जेदार चिंचेला ग्राहकांकडून वाढती मागणी, हंगामाला आला बहर

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या चिंचेच्या झाडांमुळे अनेक स्थानिकांना रोजगार मिळत आहे. चिंच तोडणी व विक्रीतून ग्रामस्थांच्या हातांना काम मिळत आहे़ चिंचेच्या बºयापैकी उपलब्धता असल्याने यावर प्रक्रियाकरुन यातून उद्योगाला चालना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़सातपुड्याच्या कुशीतील अनेक पाड्यांच्या परीसरात शेकडो दर्जेदार चिंचेची झाडे आहेत. या झाडांना यंदा चांगलाच बहर आला आहे़ दर्जा चांगला असल्याने साहजिकच शहरी भागात येथील चिंचांना मागणी जास्त आहे़ हा व्यवसाय स्थानिकांसाठी आर्थिक उत्पन्न देणारे साधन ठरत आहेत. औषधी गुण असणाºया गोड-आंबट चिंचेला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शहरी भागातील ही मागणी लक्षात घेवून अनेक व्यापारी सातपुड्यातील ग्रामस्थांकडून चिंचेची खरेदी करतांना दिसून येत आहे.या ठिकाणी असलेली चिंचेची झाले ही संबंधित कुटुंबियांच्या मालकीची असतात. दरवर्षी साधारणत: फेब्रुवारीच्या दुसºया किंवा तिसºया आठवड्यापासून चिंचेचा हंगाम सुरू होतो. आता चिंचेचा हंगाम सुरू झाला असून दरवर्षीप्रमाणे यंदाचा हंगाम हा अनेक कुटुंबांसाठी रोजगार घेऊन आला आहे. झाडावरील चिंच काढणे, तिचे टरफल व चिंचोक्या वेगळे करणे इत्यादी विविध कामे चिंचेच्या झाडाची मालकी असणारी कुटुंबिय दिसून येत आहे.कुटुंबातील अबालवृद्ध व स्त्रियादेखील या कामात व्यस्त असल्याचे चित्र आहे. टरफले वेगळी केलेल्या चिंचा हे नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवा, खापर, धडगाव अश्या शहराच्या ठिकाणी घेऊन जात त्याची व्यापाºयांना विक्री केली जाते. या चिंचांना व्यापाºयांकडून साधारणत: ४० ते ५० रुपये प्रतीकिलो असा अत्यल्प दर दिला जातो. चिंचेचे उत्पादन घेणाºया नागरिकांना जर योग्य बाजारपेठ मिळाली तर त्यांच्या चिंचेला वाढीव भाव मिळू शकतो. शहरातील अनेक जण जर चिंचेच्या झाडाची मालकी असणाºया व्यक्तीला पाच ते दहा किलो चिंचाची आॅर्डर देऊन चिंचा घरपोच मिळवून घेतात.चिंचेमध्ये कॅल्शियम, पोटॅशिअम व अनेक जीवनसत्त्वे असतात़ शिवाय रक्तदाब व संधिवात नियंत्रणात ठेवण्यासाठी चिंच गुणकारी मानली जाते. जेवण रुचकर व स्वादिष्ट बनविण्यासाठी चिंचेचा स्वयंपाकात नियमित वापर केला जातो. त्यामुळे गृहिणींकडून चिंचेला अधिक मागणी मिळताना दिसून येत आहे़