शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मांडवी ग्रामस्थांचे उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 12:44 IST

लेखी पत्र देण्याचा आग्रह : पेसा व वित्त आयोग निधीतून झालेल्या कामांची चौकशी करावी

धडगाव : वैयक्तिक शौचालय बांधकामाची कमी मिळालेली रक्कम, पेसा, चौदावा वित्त आयोगअंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या कामांच्या चौकशीसाठी मांडवी बुद्रुक, ता.धडगाव येथील ग्रामस्थांनी धडगाव पंचायत समितीसमोर गेल्या चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, येथील गटविकास अधिका:यांनी बुधवारी आंदोलकांची भेट घेऊन याप्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आंदोलकांनी लेखी पत्र देण्याचा आग्रह धरल्यामुळे हे आंदोलन गुरुवारीदेखील सुरूच होते.धडगाव तालुक्यातील मांडवी बुद्रुक येथे ग्रामपंचायतीमार्फत          स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालयांची कामे घेण्यात आली आहेत. परंतु शौचालय बांधकामाची रक्कम ग्रामपंचायतीने संबंधित लाभार्थीना अपूर्ण दिली आहे. 150 लाभार्थीना 10 हजार तर 130 लाभार्थीना आठ हजार रुपयांची रक्कम देण्यात आली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वास्तविक एक शौचालय बांधकामाची रक्कम               12 हजार रुपये असताना         संबंधितांना कमी रक्कम का दिली? असा सवाल उपस्थित करून पाच टक्के ‘पेसा’चा निधी व चौदावा वित्त आयोगातील कामांच्या खर्चामध्येही मोठा अपहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत गटविकास अधिका:यांबरोबरच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका:यांकडेही चौकशी करण्याची मागणी करूनही त्यावर ठोस  कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थ धडगाव पंचायत समितीसमोर सोमवारपासून उपोषणास बसले आहेत. बुधवारी गटविकास अधिकारी चंद्रकांत          बोढरे यांनी उपोषणार्थीची भेट       घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत           चर्चाही केली. त्यांनी शौचालय बांधकामाची बाकी असलेली           रक्कम तातडीने देण्याची हमी घेतली. परंतु पेसा व वित्त आयोगाच्या खर्चाचे लेखी पत्र द्यावे, असा आग्रह आंदोलकांनी धरला. परंतु लेखी पत्र न मिळाल्यामुळे आदोलकांचे उपोषण गुरुवारीही सुरूच होते. कामांच्या चौकशीसाठी स्वतंत्र कमिटी स्थापन करण्याचे आश्वासन गटविकास अधिका:यांनी दिले होते. परंतु आंदोलक आपल्या मागणीबाबत ठाम होते. या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य नटवर पावरा, जोरदार पाडवी, अनिल पटले, सुरेश वळवी,  शांतीलाल पावरा, चेतन साळवे, अमिताभ वळवी, जयराम पावरा, वीरसिंग पावरा, गणेश वळवी, शैलेंद्र वळवी, वन्या पाडवी, तेरसिंग वळवी, दिनकर वळवी, गिना पाडवी, वसा वळवी, जोमा वळवी, गोरख पटले आदींसह 150 ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले आहेत.