निवेदनात, ५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस पाळण्यात येतो. यानिमित्त ५ जून रोजी सक्तीने ‘नो व्हेईकल डे’ पाळला तर त्याचा मोठा सकारात्मक परिणाम होईल. पालिका व सामाजिक संस्थांकडून ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याबाबत सूचना करण्यात येतात. परंतु ते ऐच्छिक असल्याने त्याचे पालन होत नाही. यामुळे एक दिवस सक्तीचा नो व्हेईकल डे पाळण्याच्या सूचना केल्यास एकाच दिवशी वाहनांचा वापर थांबून त्याचा विभागात परिणाम होऊन प्रदूषण निर्मूलनास हातभार लागून ऑक्सिजन वृद्धी होऊ शकते. या निमित्त हा विषय प्रकर्षाने लोकांपर्यंत पोहचून जनजागृती होईल. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करून पर्यावरण दिन साजरा केला जातो. परंतु याची व्याप्ती कमी असल्याने ‘अत्यावश्यक वाहन वगळता सर्व प्रकारच्या वाहनांवर यावर्षी पर्यावरण दिनी एक दिवसाची बंदी घोषित करण्याची मागणी अखिल भारतीय मानव कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देविसिंग राजपूत व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंकज सिंधी यांनी केली आहे.
सक्तीचा ‘नो व्हेईकल-डे’ पाळण्यात यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:22 IST