शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भाचीवर बलात्कार प्रकरणी मामाला सात वर्ष कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 12:49 IST

नवापूर तालुक्यातील घटना, जिल्हा न्यायालयाचा निकाल

नंदुरबार : : मावस भाचीवर बलात्कार करणा:या युवकास नंदुरबार सत्र न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. जामदा फाटा, ता.नवापूर शिवारात ही घटना 12 जून 2016 रोजी घडली होती.शिव्रे येथे मामाकडे आलेल्या युवतीला डोगेगाव येथे लगAात नाचायला घेवून जाण्याच्या बहाण्याने मावसमामा यानेच युवतीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. धर्मा नानजी वळवी, रा.डोगेगाव, ता.नवापूर असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.    12 जून 2016 रोजी तो मावस       भाची असलेल्या युवतीला    शिव्रे येथून नातेवाईकांच्या घरून दुचाकीवर घेवून गेला होता. खांडबारा येथे पेट्रोल टाकून तो  डोगेगावकडे निघाला. त्याचवेळी त्याच्या मनात सैताण जागा झाला. रस्त्यावरील जामदा फाटाजवळील शेतातील एका झोपडीजवळ दुचाकी थांबवून तो युवतीला तेथे घेवून गेला. रात्री नऊ वाजता त्याने युवतीवर बलात्कार केला होता. दोन तासाच्या अंतराने त्याने दोनवेळा बलात्कार केला.युवतीने त्याच्यापासून सुटका करून घेत तेथून पलायन केले होते. डोगेगाव गाठून नातेवाईकाच्या घरी आसरा घेतला. दुस:या दिवशी सकाळी युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून धर्मा नानजी वळवी याच्याविरुद्ध नवापूर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस उपनिरिक्षक जे.जी.शेख यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. नंदुरबार जिल्हा सत्र न्यायाधिश अभय वाघवसे यांच्या कोर्टात हा खटला चालला. सर्व साक्षी पुरावे लक्षात घेता न्या.वाघवसे यांनी आरोपी धर्मा वळवी यास बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवून सात वर्ष सश्रम कारावास आणि     तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अॅड.गिरीश रघुवंशी यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार सुनील धनगर होते. गेल्या 15 दिवसात 15 दिवसात नऊ गंभीर गुन्ह्यात आरोपींना कठोर शिक्षा झाली. पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा सरकारी वकिल सुशिल पंडित यांनी तपासी अधिकारी जे.जी.शेख व सरकारी वकील गिरीष रघुवंशी यांचे कौतूक केले.