शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

अभियानाद्वारे नंदुरबारात कुपोषण शोध मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी व कुपोषणांतर्गत सॅम व मॅम बालकांच्या शोध मोहिमेसाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. याचअंतर्गत स्थलांतरित मजुरांच्या बालकांचीही स्वतंत्र यादी तयार करण्यात येणार असल्यामुळे कुपोषणाच्या योजना राबवितांना त्यात सुटसुटीतपणा राहणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात सद्य:स्थितीत 829 सॅम व 4,716 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी व कुपोषणांतर्गत सॅम व मॅम बालकांच्या शोध मोहिमेसाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. याचअंतर्गत स्थलांतरित मजुरांच्या बालकांचीही स्वतंत्र यादी तयार करण्यात येणार असल्यामुळे कुपोषणाच्या योजना राबवितांना त्यात सुटसुटीतपणा राहणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात सद्य:स्थितीत 829 सॅम व 4,716 मॅम बालके आहेत.केंद्र शासनाच्या नीती आयोगानुसार जिल्ह्याची आकांक्षित जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याअंतर्गत 2018 ते 2022 या कालावधीत जिल्ह्याची आरोग्य व पोषण निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. याच अंतर्गत 17 मे ते 5 जून या कालावधीत ही मोहीम आखण्यात आली आहे. अधिका:यांना मार्गदर्शनमोहिमेअंतर्गत 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी मोहीम व सॅम  आणि मॅम बालकांच्या शोध मोहिमेसाठी गाव व पाडेनिहाय सूक्ष्म नियोजन तयार करण्यात आले आहे. नुकतीच जिल्हास्तरावरील सर्व तालुका आरोग्य अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांची बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर 14 मे रोजी तिन्ही तालुक्यात सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, महिला बालविकास विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात आली. गंभीर तीव्र कुपोषित अर्थात सॅम व मध्यम तीव्र कुपोषित अर्थात मॅम बालकांना प्राधान्यक्रमाने आरोग्य व आहार सेवा देणे गरजेचे असते. या बालकांपैकी ज्या बालकांचे वजन त्यांच्या लांबी व उंचीच्या प्रमाणात मर्यादेपेक्षा कमी असते अशा गंभीर तीव्र कुपोषित बालकांना साधारण बालकांच्या तुलनेत मृत्यूचा धोका दहा पटीने जास्त असतो. म्हणून अशा बालकांना विशेष आरोग्य व आहार या सेवा प्राधान्याने देऊन बालमृत्यूदर कमी करता येतो. या धर्तीवर जिल्ह्यातील मोलगी या अतिदुर्गम आदिवासी भागात ग्रामीण रुग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्राची सुरुवात गेल्यावर्षी 17 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली होती. या केंद्रात वर्षभरात एकुण 161 गंभीर तीव्र कुपोषित बालकांवर उपचार करण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्रातील एकमेव पोषण पुनर्वसन केंद्र आहे जेथे परसबाग तयार करण्यात आलेली असून या परसबागेतून मिळणा:या भाजीपालाद्वारे वेगवेगळ्या पाककृती मातांना शिकविण्यात येतात.