शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

बोलक्या भिंतींमुळे विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भवितव्याचा मार्ग होतोय सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 14:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरालगत होळ तर्फे हवेली शिवारातील समाजकल्याण विभागाचे वसतीगृह आणि निवासी शाळा यांना नुकतेच आयएसओ मानांकन मिळाले आह़े यासाठी तयार केलेल्या बोलक्या भितींमुळे विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भवितव्याचा मार्ग सुकर झाला आह़े  होळ शिवारात 2011 पासून कार्यान्वित झालेल्या या निवासी शाळा आणि वसतीगृहासाठी स्वतंत्र अशा इमारती तयार करण्यात आल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरालगत होळ तर्फे हवेली शिवारातील समाजकल्याण विभागाचे वसतीगृह आणि निवासी शाळा यांना नुकतेच आयएसओ मानांकन मिळाले आह़े यासाठी तयार केलेल्या बोलक्या भितींमुळे विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भवितव्याचा मार्ग सुकर झाला आह़े  होळ शिवारात 2011 पासून कार्यान्वित झालेल्या या निवासी शाळा आणि वसतीगृहासाठी स्वतंत्र अशा इमारती तयार करण्यात आल्या आहेत़ मागासवर्गीय घटकातील विद्यार्थिनींची शैक्षणिक, समाजिक आणि आर्थिक उन्नती व्हावी यासाठी सुरू करण्यात झालेल्या वसतीगृहातून गत सात वर्षात शेकडो विद्यार्थिनी बाहेर पडल्या आहेत़ शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासासह स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा क्षेत्रात यश मिळवत ब:याच विद्यार्थिनी यशस्वी ठरल्या आहेत़ सकस आहार आणि शेकडो पुस्तकांचे सानिध्य यासोबतच विद्यार्थिनींनी फुलवलेली परसबाग हा येथील आकर्षणाचा केंद्रबिंदू आह़े 1 हजार 700 पुस्तके आहेत अभ्यासाला एकाच संकुलातील दोन इमारतींमधील शासनाच्या उपक्रमांना जिल्ह्यात प्रथमच आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आह़े मुलींच्या वसतीगृहात सध्या 120 तर सहावी ते 10 वीच्या निवासी शाळेत 173 विद्यार्थिनी आहेत़ यातील विद्यार्थिनींच्या वसतीगृहात 1 हजार 700 पुस्तकांचे ग्रंथालय निर्माण करण्यात आले आह़े महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच बहुतांश विद्यार्थिनी याठिकाणी अभ्यास करून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत़ त्यांना गरजेनुसार पुस्तके समाजकल्याण विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येत आह़े या ठिकाणी गृहपाल, सहायक गृहपाल यांच्यासह 11 इतर कर्मचारी नियुक्त आहेत़ निवासी शाळेतील 173 विद्यार्थिनींसाठी एक मुख्याध्यापिका, अधिक्षिका, चार प्राथमिक आणि दोन माध्यमिक असे सहा आणि तन शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत़ त्यांच्याकडून या परिसराची देखरेख करण्यात येत़े वसतीगृह आणि निवासी शाळेतील विद्यार्थिनींनी गरजेनुसार वाय-फाय, इंटरनेट आणि संगणक उपलब्ध करून दिले जातात़ तसेच व्यायामाचे अत्याधुनिक साधनेही याठिकाणी ठेवण्यात आली आहेत़