शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईबाबत वस्तुनिष्ठ नियोजन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 12:46 IST

नवापुरात बैठक : सुरुपसिंग नाईक यांच्या सूचना, विविध विभगांचा आढावा

नवापूर : आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार नाही यासाठी संबंधित यंत्रणेने वस्तुनिष्ठ नियोजन करून दक्षता घ्याव्यात, अशा सूचना  आमदार सुरूपसिंग नाईक यांनी दिल्या. तालुक्यातील सर्व विभागांच्या अधिका:यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जि.प. अध्यक्षा रजनी नाईक, बाजार समितीचे सभापती मधुकर नाईक, तहसीलदार सुनीता ज:हाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर,  नायब तहसीलदार राजेंद्र नजन, सहायक गटविकास अधिकारी बी.डी. गोसावी, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रथमेश हाडपे, तालुका कृषी अधिकारी व्ही.डी. चौधरी, पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजय पाडवी, जेरा वळवी, सहायक निबंधक प्रताप पाडवी, लघुसिंचन, पाटबंधारे व पंचायत समिती बांधकाम व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते. तालुक्यात विद्युत पुरवठय़ाच्या अनियमिततेचा प्रश्न सर्वदूर भेडसावत आहे. शहरी व ग्रामीण भागात पाणीपुरवठय़ाचा तथा सिंचनाचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला असल्याने बैठकीच्या सुरुवातीस याच प्रश्नाला थेट हात घालण्यात आला. नवापूर तालुक्यात वीज बिलाच्या रकमेची वसुली कमी असून त्या तुलनेत विजेचा वापर जास्त असल्याने गुणानुक्रमे नवापूरचे स्थान घसरल्याची माहिती सहाय्यक अभियंता राकेश गावीत यांनी दिली. शहरात विद्युत भारनियमन सुरु झाले असून त्याचे वेळापत्रक पाणी पुरविण्यात समस्या निर्माण करीत असल्याचे पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. ग्रामीण भागात विद्युत भारनियमनाच्या व्यतिरिक्तही भारनियमन होत असून संपूर्ण रात्र काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याच्या तक्रारी आहेत. विद्युत पुरवठय़ाच्या दाबात व नियमिततेत सुधारणा आणाव्यात अशा सूचना आमदार सुरूपसिंग नाईक यांनी केल्यावर शहरी व ग्रामीण विद्युत भारनियमनाचे सुधारित वेळापत्रक तयार करून त्यास मंजुरी घेऊ, असे आश्वासन राकेश गावीत यांनी दिले. तालुक्यात यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने यंदा टंचाईची झळ बसेल हे स्पष्ट असल्याने मध्यम व लघु प्रकल्प तथा साठवण बंधा:यांमधे आज पाण्याचा साठा किती आहे? जून 2019 पावेतो पाण्याचा साठा कसा उपलब्ध राहू शकेल? विसरवाडी व खांडबारा भागात पाण्याचे प्रमाण कमी असल्याने वेळीच उपाय योजण्याच्या सूचना आमदार नाईक यांनी केल्या. विसरवाडी व खांडबारा भागातील प्रकल्पांमध्ये असलेल्या पाणीसाठय़ाचे व भेडसावणा:या संभाव्य परिस्थितीचे आताच सर्वेक्षण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.16 ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाल्याने ग्रामीण भागात रस्ते व पुलांची मोठय़ा प्रमाणावर पडझड झाल्याने क्षतीग्रस्त रस्ते व पूल उभारणी तथा दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. काही कामांना मंजुरी मिळाली असून लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती सहाय्यक अभियंता जेरा वळवी यांनी दिली. सद्यस्थितीत नद्या, साठवण बंधारे, लघु व मध्यम प्रकल्पांमधून पाणी वाहून जात असून लोकसहभागातून वनराई बंधारे उभारून ते पाणी अडविण्याची        मोहीम प्रत्येक गावात राबविण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर              यांनी दिली. कृषी विभागअंतर्गत             सुरु असलेले व प्रस्तावित               कामांची माहिती व्ही.डी. चौधरी यांनी दिली. तालुक्यातील शेतक:यांना मिळालेल्या कर्जमाफीबाबतची माहिती सहायक निबंधक प्रताप पाडवी यांनी दिली. तालुक्यात बहुतांश रेशन दुकानात ठराविक नागरिकांना रेशनचे धान्य दिले जाते व इतरांना रेशनचे धान्य मिळतच नाही अशा तक्रारी असल्याने याबाबत लक्ष देण्यात यावे, अशी सूचनाही आमदार नाईक यांनी संबंधितांना दिली.