शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 13:12 IST

बदल्यांचे आदेश : 11 निरिक्षक, 13 सहा.निरिक्षक तर 15 उपनिरिक्षकांचा समावेश

नंदुरबार : जिल्हाअंतर्गत मोठय़ा प्रमाणावर पोलीस अधिका:यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शनिवारी सकाळी पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी हे आदेश काढले. त्यात 11 पोलीस निरिक्षक, 13 सहायक निरिक्षक तर 15 पोलीस उपनिरिक्षकांचा समावेश आहे. बदली झालेल्या अधिका:यांना लागलीच पदभार स्विकारण्यास सांगण्यात आले आहे.पोलीस निरिक्षक, सहायक पोलीस निरिक्षक आणि उपनिरिक्षकांच्या राज्य व विभागीयस्तरीय बदल्या झाल्यानंतर आता जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी यासंदर्भातील आदेश शनिवारी काढले.पोलीस निरिक्षकांच्या बदल्यांमध्ये शहर वाहतूक शाखेचे निरिक्षक गिरीश पाटील यांची नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा विशेष शाखेचे निरिक्षक एस.डी.भोये यांची शहर वाहतूक शाखेत, के.जी.पवार यांची वाहतूक शाखा शहादा उपविभागातून सायबर सेलमध्ये. एस.पी.रणदिवे यांची उपनगर पोलीस ठाण्यातून जिल्हा विशेष शाखेत. डी.के.बुधवंत यांची नियंत्रण कक्षातून उपनगर पोलीस ठाण्यात. एन.जी.पवार यांची उपनगर पोलीस ठाण्यातून नियंत्रण कक्ष व पोलीस कल्याण विभाग. संजय महाजन यांची सरदार सरोवर प्रकल्पातून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात. नितीन चव्हाण यांची शहर पोलीस ठाण्यातून तळोदा पोलीस ठाण्यात. एस.आर.मथुरे यांची शहर पोलीस ठाण्यातून नियंत्रण कक्षात प्रभारी अधिकारी म्हणून. डी.एन.गवळी यांची नियंत्रण कक्षातून सरदार सरोवर प्रकल्पात. एस.एस.शुक्ला यांची शहादा पोलीसात तात्पुरती नियुक्ती होती ती आता कायम करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरिक्षकांमध्ये राकेश चौधरी यांची म्हसावद पोलीस ठाण्यातून पोलीस अधिक्षक कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. एस.एन.भंडारे यांची नवापूरहून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात. एस.टी.बच्छाव यांची उपनगर पोलीस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखा व सायबर सेलमध्ये. एम.डी.पगार यांची सारंगखेडा पोलीस ठाण्यातून म्हसावद पोलीस ठाण्यात. डी.डी.पाटील यांची नवापूरहून बदलीस सहा महिने स्थगिती देण्यात आली आहे. जी.एम.न्हायदे यांची एलसीबीमधून सारंगखेडा पोलीस ठाण्यात. डी.एस.शिंपी यांची वाचक शाखेतून नवापूर पोलीस ठाण्यात. एस.के.जाधव यांची शहादाहून मोलगी पोलीस ठाण्यात. जी.टी.पवार यांची नियंत्रण कक्षातून तालुका पोलीस ठाण्यात. के.एस.पगार यांची नियंत्रण कक्षातून अपर पोलीस अधीक्षक यांचे वाचक म्हणून. वाय.एस.कामाले यांची जिल्हा विशेष शाखेतून एलसीबीला. डी.डी.निळे यांची नियंत्रण कक्षातून पोलीस अधीक्षक यांचे वाचक म्हणून. एम.एस.माळी यांची अपर पोलीस अधीक्षक वाचक शाखेतून उपनगर पोलीस ठाण्यात. ए.एम.बेहरानी यांची नियंत्रण कक्षातून शहादा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.पोलीस उपनिरिक्षकांच्या बदल्यांमध्ये एस.एन.पाटील यांची नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातून नवापूर पोलीस ठाण्यात. वाय.एस.राऊत यांची अक्कलकुवाहून शहादा पोलीस ठाण्यात. डी.जे.बडगुजर यांची शहादा पोलीस ठाण्यातून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात. बी.डी.शिंदे यांची शहादाहून जिल्हा विशेष शाखेत. एस.आर.बि:हाडे यांची नियंत्रण कक्षातून शहर पोलीस ठाण्यात. डी.टी.बि:हाडे यांची विसरवाडी पोलीस ठाण्यातून नंदुरबार उपविभागीय पोलीस अधीक्षक यांचे वाचक म्हणून. डी.एन.चौधरी यांची अपर पोलीस अधीक्षक यांचे वाचक शाखेतून शहर पोलीस ठाण्यात. आर.डी.जगताप यांची तालुका पोलीस ठाण्यातून शहर पोलीस ठाण्यात. सी.एम.शिंदे यांची तळोदाहून विसरवाडी पोलीस ठाण्यात. डी.जे.सोनवणे यांची मोलगीतून सारंगखेडा पोलीस ठाण्यात. वाय.एस.पाटील यांची सीसीटीएनएस नंदुरबारहून शहर पोलीस ठाण्यात. अे.सी.मोरे यांची धडगावला. बी.के.कोळी यांची नियंत्रण कक्षातून एलसीबीला तर ए.के.नेरकर यांची शहादा पोलीस ठाण्यातून शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे वाचक म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी अनेक अधिका:यांच्या हातात बदलीच्या ऑर्डरी पडल्या.