शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातील मुख्य रस्ते झाले मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 13:52 IST

पालिकेची कारवाई : मुख्य रस्ते व चौकातील अतिक्रमण हटविले

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील बसस्थानकालगत, डोंगरगाव रोड, दोंडाईचा रोड, मोहिदा रोडलगत असलेले पक्के अतिक्रमण व वाहतुकीला अडथळा ठरणा:या टप:यांसह इतर अतिक्रमण पालिकेतर्फे काढण्यात आले. शुक्रवारी पक्के व तात्पुरत्या स्वरुपातील 255 अतिक्रमण हटविण्यात आले.शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा ठरणारे अनधिकृत अतिक्रमणधारकांना पालिकेने नोटीसा देऊन तीन   दिवसात अतिक्रमण काढण्याबाबत सूचना केली होती. मात्र अतिक्रमणधारकांनी  दिवाळीर्पयत अतिक्रमण काढू नये, अशी विनंती पालिका व जिल्हा प्रशासनकडे केली होती. मात्र त्यांची प्रशासनाकडून निराशा झाली. अतिक्रमण काढण्याबाबत तीन दिवसांची मुदत गुरुवारी संपल्याने शुक्रवारी सकाळपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ झाला.दिवाळीर्पयत अतिक्रमण काढू नये या मागणीला प्रतिसाद न मिळाल्याने अतिक्रमणधारकांनी दुकानांमधील साहित्य काढण्यासाठी व्यावसायिकांची लगबग सुरू झाली होती. शुक्रवारी सकाळी सात वाजेपासून पानटपरी, सलून, लाँड्री, किराणा दुकान, चहा-नाश्ता, कटलरी  आदी व्यवसायासाठी रस्त्यालगत ठेवलेल्या टप:या काढण्याचे काम   सुरू झाले. जेसीबी मशीनच्या सहाय्याने पक्के अतिक्रमण काढण्यात आले. सायंकाळर्पयत बसस्थानकापासून शासकीय विश्रामगृह, जवाहर स्टोअर्ससमोर ते पटेल रेसीडेन्सीसमोर, महात्मा ज्योतीबा फुले चौक ते महाराणा प्रताप चौक, मोहिदा रस्त्यावरील बेकायदेशीर पक्के अतिक्रमण व टप:या हटविण्यात आले. या वेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी एम.बी. पाटील, तहसीलदार मनोज खैरनार, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, पोलीस उपनिरीक्षक सुभाष  जाधव, ज्ञानेश्वर बडगुजर, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस व राज्य राखीव दलाचे    जवान यांच्या फौजफाटय़ासह अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.