शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या वाट्याचे पाणी वापराबाबत महाराष्ट्राची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:48 IST

तापी खोऱ्यातील पाणी देण्याबाबत गुजरात सरकार नकार देत असले तरी यापूर्वी उकाई आणि नर्मदेचे आरक्षित १६ टीएमसी पाणी उचलण्याबाबतही महाराष्ट्र शासनाची उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे या १६ टीएमसी पाण्याच्या वापराबाबत योजनांची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नंदुरबार : एकीकडे तापी-पार-नर्मदा नद्याजोड प्रकल्पातील महाराष्ट्राच्या हिश्शाचे तापी खोऱ्यातील पाणी देण्याबाबत गुजरात सरकार नकार देत असले तरी यापूर्वी उकाई आणि नर्मदेचे आरक्षित १६ टीएमसी पाणी उचलण्याबाबतही महाराष्ट्र शासनाची उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे या १६ टीएमसी पाण्याच्या वापराबाबत योजनांची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.तापी-पार-नर्मदा नद्याजोड प्रकल्पासाठी तापी खोºयातील महाराष्टÑाच्या हिश्शाचे गुजरातकडून ४३४ दशलक्ष घनमीटर पाणी मिळावे, अशी मागणी राज्य शासनाने केली आहे. मात्र त्याबाबत गुजरात सरकारने नकार दिला आहे. त्यामुळे या पाण्यासंदर्भात सध्या दोन्ही राज्यांतील वाद चव्हाट्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर उकाई आणि नर्मदेतील आरक्षित पाण्याबाबत जनतेने प्रश्न उपस्थित केला आहे. सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी गुजरातमधील तापीवरील उकाई धरणातील पाच टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. हे पाणी उपसा योजनेद्वारे उचलण्यासाठी गेल्या १० वर्षात तीन वेळा सर्वेक्षण झाले आहे. मात्र प्रत्यक्षात योजनेची अंमलबजावणी झालेली नाही. याशिवाय सरदार सरोवर प्रकल्पातील ११ टीएमसी पाणी महाराष्टÑाच्या हिश्शाला आले आहे. हे पाणी उचलण्याबाबत गेल्या १० वर्षात सर्वेक्षण होऊन प्राथमिक योजना तयार करण्यात आली आहे. त्यासाठी महाराष्टÑ शासनाने सहा कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला आहे. जवळपास अडीच हजार कोटी रुपयांची ही योजना आकारास येणार आहे. मात्र अद्यापही योजनेच्या कामाला सुरुवात नाही. ही योजना तांत्रिक सर्वेक्षणाच्या वादातच अजून अडकून आहे.त्यामुळे एकूणच महाराष्टÑ शासनाच्या उदासीन धोरणामुळे पाणी वाटपातील करार वादातीत ठरत आहे. उकाई आणि नर्मदेची योजना अशीच लांबल्यास त्याबाबतदेखील भविष्यात वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याने आरक्षणाच्या पाणी वापराबाबत तत्काळ निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.