शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

टर्कीकरांना भावला महाराष्ट्रीयन पेहराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 11:55 IST

नव्वारीचे आकर्षण : प्रितम-प्रिशा यांचा वैदिक पध्दतीने विवाह

तळोदा : तळोदा येथील प्रितम तर टर्कीतील प्रिशा यांचा बहुचर्चित विवाह समारंभ तळोदा येथे साध्या पध्दतीने पार पडला़ या वेळी वधु पक्षातील लोकांना तळोदेकरांचा पाहुणचार व महाराष्ट्रीय पेहराव चांगलाच भावल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े बुधवारी दोघेही वैदीक पध्दतीने विवाहबंधनात अडकल़े तळोदा शहरातील सूर्यकांत राजकुळे यांचे सुपूत्र प्रितम व टर्की येथील उसल ओजगेन यांची कन्या प्रिशा हांडे यांची भेट आर्यलंड येथे झाली़ दोघेही शास्त्रज्ञ म्हणून एकाच ठिकाणी काम करीत असताना ऐकमेकांशी परिचय झाला़ परिचयाचे रुपांतर प्रेमात होऊन दोघांनीही विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला़ दोघींनी आपआपल्या आई-वडीलांना याची माहिती देत विवाहाचा प्रस्ताव ठेवला़ परिवारांनीही तत्काळ यास होकार भरत विवाहाला संमती दिली़ त्यानुसार बुधवारी तळोद्यातील बहुचर्चित विवाह पार पडला़ प्रिशा हांडे यांचे वडील उसल ओजगेन सिव्हिल इंजिनियर म्हणून टर्की येथे सेवानिवृत्त झाले आहेत़  हांडेचे कुटुंबिय मानवता हाच धर्म मानणारे असल्याने त्यांना भारतीय संस्कृतीचे आधीपासून आकर्षण, आदर व प्रेम होतेच यातून दोघांचे कुटुंब एकत्र आले व दोन्ही कुटुंबीयांनी आपल्या मुला-मुलींचा विवाह एक  वर्षापूर्वी निश्चित केला़ त्या नुसार हा विवाह सोहळा तळोदा येथे 12 डिसेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी घटिका मुहूर्तावर वैदिक पद्धतीने झाला़ तर 13 डिसेंबर रोजी रिसेप्शन सोहळा होणार आह़े त्या आधी वधू-वराची वरात सजवलेल्या बग्गीतून तळोदा शहरातून काढण्यात येणार आह़े या विवाह सोहळ्यासाठी वधूचे  अमेरिका, कॅनडा, जपान व टर्कीमध्ये राहणारे नातेवाईक व दोघांचे मित्र-मैत्रिणी तळोद्यात आले होत़ेप्रिशा तसेच त्यांचे नातलग यांनी खास पध्दतीचा महाराष्ट्रीय पेहराव परिधान केला होता़ प्रिशा यांच्यासह सर्व महिलांनी नव्वारी साडी व भगवा फेटा घालून उपस्थितांचे लक्ष वेधले होत़े हा खास महाराष्ट्रीयन पेहराव पाहून सर्वानाच त्याचे कुतूहल वाटत होत़े