शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

प्रेमीयुगुलाचे दिल मांगे मोअर, बापाच्या जिवाला मात्र घोर

By admin | Updated: May 7, 2014 08:05 IST

प्रेमाला वयाचे, जातीपातीचे आणि धर्माचे बंधन नसते. प्रेमात आंधळे झाल्याचे अनेक किस्से पहायला मिळतात.

जळगाव : प्रेमाला वयाचे, जातीपातीचे आणि धर्माचे बंधन नसते. प्रेमात आंधळे झाल्याचे अनेक किस्से पहायला मिळतात. असाच किस्सा मंगळवारी पहायला मिळाला. गेंदालाल मिल भागातील एक प्रेमीयुगुल मंगळवारी दुपारी दुचाकीवर फिरायला निघाले. कानळदा रस्त्यावर फिरत असलेल्या या प्रेमीयुगुलावर मुलीच्या बापाची नजर पडली. भंबेरी उडालेले दोघे दुचाकी सोडून पळाले. काही वेळेनंतर वडील आणि प्रियकर यांच्यात हाणामारी होऊन प्रकरण शहर पोलीस स्टेशनपर्यंत आले. गेंदालाल मिल भागातील तरुणीचे याच भागातील एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू आहे. खाजगी दुकानावर काम करणार्‍या वडिलांना मुलगी घरात न दिसल्याने त्यांनी तिचा शोध सुरू केला. शोध घेत असताना ते कानळदा रस्त्यावर आले. या ठिकाणी दोघेजण एका दुचाकीवर फिरताना त्यांना दिसले. मुलगी आणि तिच्या प्रियकराला जिवाच्या आकांताने थांबविण्याचा प्रयत्न केला. प्रियकरासोबत आपल्याला पकडल्यानंतर वडील मारतील या भीतीने तिने गाडीवरून उडी मारून पळायला सुरुवात केली. मुलगी पळाली म्हटल्यावर मुलानेदेखील दुचाकी जागेवर सोडून पळ काढला. वडिलांनी धापा टाकत पुन्हा घर गाठले. काही वेळेनंतर घराबाहेर पडल्यानंतर मुलीचा प्रियकर योगायोगाने तहसील कार्यालयाजवळ दिसला. दोघांची या ठिकाणी झटापट झाली. त्यानंतर प्रियकर व मुलीचे वडील आपापल्या मार्गाने रवाना झाले. त्यानंतर वडिलांनी शहर पोलीस स्टेशन गाठत मुलाविरुद्ध तक्रार नोंदविली. थोड्या वेळेनंतर डोक्याला पट्टी बांधलेल्या अवस्थेत प्रियकर पोलीस स्टेशनला आला. त्याच्यासोबत त्याची प्रेयसी, आई व शेजारी होते. मुलीच्या वडिलांकडून जीवाला धोका असल्याचे सांगत अटक करण्याची मागणी प्रियकर पोलिसांकडे करू लागला. मुलीनेदेखील लग्न याच मुलाशी करणार असा हट्ट धरला. प्रियकर जेथे जाईल तेथे आपण जाऊ असा हट्ट धरल्यानंतर पोलीस हतबल झाले. मुलगी लग्नाला तयार असली तरी तिचे वडील मात्र आपल्या जिवावर उठले असल्याचे सांगत मुलाने लग्न करण्यास नकार दिला. दोन्ही बाजूचा गोंधळ पाहून सेवानिवृत्तीकडे झुकलेल्या एका पोलीस कर्मचार्‍याने तरुणीला वडिलांना समजावण्यास सांगितले. मात्र गोंधळ सुरुच असल्याने पोलिसांनी दोघांना बाहेर थांबून विचारविनियम करण्यास सांगितले. काही वेळेनंतर दोघांनी आमची तक्रार नसल्याचे सांगितल्याने त्यांना समज देण्यात आली.