शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

काठीच्या राजवाडी होळीसाठी लोटला जनसागर, देशभरातील पर्यटकांचीही उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 800 वर्षाचा सांस्कृतिक वारसा असलेल्या काठी ता़ अक्क्कलकुवा येथे मानव कल्याणाची  प्रार्थना करण्यात येऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 800 वर्षाचा सांस्कृतिक वारसा असलेल्या काठी ता़ अक्क्कलकुवा येथे मानव कल्याणाची  प्रार्थना करण्यात येऊन गुरुवारी पहाटे राजवाडी होळी पेटवण्यात आली़ तत्पूर्वी ढोल, बिरी, मांदल या पारंपरिक वाद्यांसह बँन्डच्या तालावर नवस करणारे मोरखी, बावा, बुध्या, ढाणका यांनी फेर धरुन नृत्य केल़े त्यांच्या कमरेला बांधलेल्या तुंबडे आणि घुंगरांचा नाद सातपुडय़ाच्या द:या-खो:यात गुंजत होता़    होलिकोत्सवात पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ़हीना गावीत, आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, आमदार अॅड़ क़ेसी़ पाडवी, आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनिषा वर्मा, माजीमंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी, जयपालसिंह रावल, माजी आमदार नरेंद्र पाडवी, माजी सभापती सी़क़ेपाडवी, अक्कलकुवा पंचायत समितीचे उपसभापती भाऊ राणा, डॉ़ सुहास नटावदकर, प्राचार्या सुहासिनी नटावदकर, कुमुदिनी गावीत, डॉ़सुप्रिया गावीत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवत राजवाडी होळीचा आनंद लुटला़ काठी येथील मुख्य होळी चौकात  होळीसाठी नवस करणारे मोरखी, बावा, बुध्या, ढाणका यांच्या पथकांनी ढोल, बिरी, बॅन्ड याच्या तालावर नृत्य केल़े डोक्यावर मोरपिस आणि कागदापासून तयार केलेला तुरा, त्यावर केलेली आकर्षक लायटिंग, अंगावर पांढरी नक्षी या वेशातील बावा आणि बुध्या यांच्या नृत्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडल़े रात्रभर सुरू असलेल्या जल्लोषाचा समारोप पहाटे होळी पेटवून करण्यात आला़ होळी दर्शनानंतर नवस करणा:यांनी उपवास सोडल़े  काठीच्या पारंपरिक राजवाडी होळीसाठी देशभरातून पर्यटक येथे दाखल झाले होत़े खान्देशासह राज्याच्या विविध भागातून तसेच गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान येथील आदिवासी बांधव आणि पर्यटक येथे उपस्थित होत़े होळीदरम्यानच मेलादाही येथे भरवण्यात आला होता़ यात खाद्यपदार्थ, फळ, पूजा साहित्य, खेळणी यासह विविध साहित्य विक्रेते हजर होत़े काठी गावात रात्रभर सुरु असलेल्या या मेलाद्यातून हजारो रुपयांची उलाढाल झाली होती़ मोलगी व धडगाव पोलीस ठाण्याच्यावतीने येथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येऊन धडगाव ते मोलगी मार्गावरची वाहतूकही सुरळीत करण्यात येत होती़ गुजरात राज्यातील नामगीरच्या जंगलातील बांबू घेत होळीचे मानकरी काठीकडे रवाना झाले होत़े बुधवारी सकाळी वडफळी ता़ अक्कलकुवा येथे विश्राम केल्यानंतर ते सायंकाळी काठी येथे आले होत़े साधारण 60 फूट उंचीचा बांबू त्यांनी आणला होता़ होळीचा हा बांबू गावालगतच्या निंबाच्या झाडाजवळ बांबू ठेवल्यानंतर याठिकाणी आदिवासी बांधवांकडून त्याचे दर्शन घेतले जात होत़े बांबूंचा बुंधा उचलून नवस पूर्ण करत मनोकामना केली जात होती़ होळी चौकात बावा आणि बुध्या यांचे नृत्य रंगत असताना दुसरीकडे बांबूच्या पूजनासाठी गर्दी होत होती़ रात्रभर बांबूचे पूजन झाल्यानंतर पहाटे होळी तयार करून बापा राऊत,दोह:या वसावे, गोप्या वसावे, सांगा राऊत, जोतन्या वसावे यांनी होळीच्या दांडय़ाला जांभूळ, आंबा पाने, बांबुची ताटली, शेणाची गोवरी, लहान सुपारी, खराटा, पाच तांदूळाच्या भाकरींची सजावट केली होती़ यानंतर हा बांब चौकात हाताने खोदलेल्या खड्डय़ाकडे विधिवत पूजन करुन नेण्यात आला़पहाटे सहा वाजेच्या सुमारास काठी संस्थानचे वारस महेंद्रसिंग प्रतापसिंग पाडवी, पृथ्वीसिंग उदयसिंग पाडवी, रणजित भगतसिंग पाडवी यांच्याहस्ते प्रज्वलित करण्यात आली़ यानंतर पारंपरिक पद्धतीने पूर्वेच्या बाजूने झुकलेला बांबूचा शेंडा धा:याच्या सहाय्याने तोडून प्रसादाचे वाटप करण्यात आल़े आरती करण्यात येऊन होळीला नैवेद्य देण्यात आला़ यात  गूळ, दाळ्या, संत्री यांचा समावेश होता़ होळीचा दांडा पूर्व दिशेला पडल्यानंतर प्रत्येक जण समाधानी होत़े मान्यतेनुसार पूव्रेला पडलेला होळीचा दांडा सुख आणि समृद्धी यात भरभराट करतो़ रात्रभर होळीचा फेर पाहणा:यांना हे दृश्य सुखावह होत़े होळीच्या दांडय़ाखालून जाऊन नृत्य पथकातील बुध्या आणि बावा यांनी प्रदक्षिणा पूर्ण केल्या़ होळीचा दांडा कोसळल्यानंतरर परंपरेनुसार धा:याच्या सहाय्याने होळीचा शेंडय़ाचा तुकडा पाडून बांधलेला प्रसाद फेर धरून नाचणा:या नृत्य पथकांना वाटप करण्यात आला़ स्थानिक पुजारा होळी पूजनापूर्वी ‘होलीमाता देह डोगुम रेहनारा, आख्खा समाजुले तिखिज, या धरतीपे रेहनारा आख्खा माहून हाजी मोकनारी, खेतूंम पाय पाडणारी, आख्खा जीऊल संभालनारी, हाजो जीवन आपनारी होली माता, आख्ख्यान हाजो थव, एंह की हात जोडीन पागे पोडते वंदन केहतो’ असे आवाहन करुन वंदन करतात़ त्यांच्या या प्रार्थनेचा अर्थ म्हणजे दुर्गम डोंगराळ भागात राहणारे सर्व समाजाला तसेच या धर्तीवर राहणा:या मानवांना सुखी ठेवणारी, शेतात धनधान्य पिकवणारी, सर्व जीवजंतूंना सांभाळणारी सर्वाना चांगलं जीवन देणारी होळी माता, आम्हा सर्वाना चांगल ठेव, हेच हात जोडून वंदन करतो़ काठी येथील होळीत पुजारांनी वंदन केल्यानंतर शेकडो आदिवासींनी हीच प्रार्थना करत होळी पेटवली होती़