शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दलित-आदिवासी संघटनांकडून बंद, शहाद्यात दगडफेकीच्या घटनेत चार बसेसचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंबधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर फेरयाचिका दाखल करून कायद्याला बळकटी देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध दलित-आदिवासी संघटना आणि आदिवासी दलित मागासवर्गीय संघर्ष समिती यांच्याकडून कडकडीत बंद पाळण्यात आला़ शहादा येथील दगडफेकीची घटना वगळता इतर भागात शांततेत बंद पाळण्यात येत आह़े   अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंबधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर फेरयाचिका दाखल करून कायद्याला बळकटी देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध दलित-आदिवासी संघटना आणि आदिवासी दलित मागासवर्गीय संघर्ष समिती यांच्याकडून कडकडीत बंद पाळण्यात आला़ शहादा येथील दगडफेकीची घटना वगळता इतर भागात शांततेत बंद पाळण्यात येत आह़े   अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर पूर्ववत कठोर अंमलबजावणी व्हावी यासाठी देशभर सोमवारी बंद पुकारण्यात आला़ यात जिल्ह्यातील सर्व दलित-आदिवासी संघटनांनी सहभाग घेतला़ सोमवारी मोलगी, धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, नवापूर, खांडबारा, विसरवाडी, चिंचपाडा, शहादा यासह ठिकठिकाणी सकाळपासूनच दुकाने बंद होती़ बंदची माहिती रविवारी विविध संघटनांकडून देण्यात आल्याने बाजारपेठा बंद होत्या़ दरम्यान शहादा शहरात सकाळी 9़30 वाजेच्या सुमारास चार बसेसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली़ यात बसेसच्या काचा फूटून नुकसान झाल़े शहादा आगाराची शहादा-पाडळदा (एमएच 14-बीटी 1356), (एमएच 20-बीएल 0551) शहादा-खैरवे, (एमएच 14-बीटी 1699) मोलगी-नवापूर आणि एमएच 14-बीटी 1356 या चार बसेवर दगडफेक करण्यात आली़ यात बसेसचे 1 लाख 20 हजार रूपयांचे नुकसान झाले आह़े दगडफेकीच्या घटनेनंतर शहादा शहरातील तुरळक सुरू असलेली दुकाने तात्काळ बंद करण्यात येऊन शाळांना सुटी देण्यात आली होती़ शहादा येथे आदिवासी दलित संघर्ष समितीच्यावतीने तहसीलदार कार्यालयाजवळ धरणे आंदोलन सुरू करण्यात आल़े नंदुरबार शहरातील विविध भागात बंदचे आवाहन करणारे संघटनांचे कार्यकर्ते आणि व्यावसायिक यांच्यात किरकोळ वाद वगळता शहरात शांततेत बंद पाळण्यात आला़