शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीमुळे केळी व पपईचे रोगराईमुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : अवकाळीने उघडीप दिल्यानंतर आता त्याचे परीणाम समोर येत असून केळी वर करपा तर पपईवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : अवकाळीने उघडीप दिल्यानंतर आता त्याचे परीणाम समोर येत असून केळी वर करपा तर पपईवर डावणी, करपा आणि मोजखा या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत़ यातून रब्बीचीही कामे सुरु करण्यात आल्याने शेतशिवारात शेतकरी आणि मजूर यांची वर्दळ वाढली आह़े शहादा तालुक्यातील  ब्राrाणपुरी सह परिसरात पपई, केळीची वार्षिक नियोजनानुसार शेतक:यांनी लागवड केली होती़ खरीप पिकांसोबत केळी आणि पपईचे संगोपन करत शेतक:यांनी मोठा खर्च केला होता़  परंतू अवकाळी पाऊस आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे दोन्ही फळ पिकांना ऊन कमी मिळाल्याने परिणाम झाला आह़े यातून पपईच्या झाडांवर झालेली फळधारणा ही अपेक्षेपेक्षा कमी असल्याने शेतक:यांना फटका बसला आह़े दोन आठवडय़ात ब:याच ठिकाणी शेतात पाणी साचल्याने ब:याच झाडांवर मर येऊन झाडांचे नुकसान झाले होत़े त्यात पुन्हा फळधारणा कमी होण्याची शक्यता असल्याने फवारणीला सुरुवात करण्यात आली आह़े  ब्राrाणपुरी, गोदीपूर, म्हसावद, अंबापुर, गणोर यासह मध्यप्रदेश सिमेलगतच्या गावांमध्ये केळीवर फवारणी करण्यात येत असल्याने शेतकरी कामांमध्ये व्यस्त असल्याचे चित्र आह़े अवकाळीमुळे मका ,सोयाबीन आणि ज्वारीचे नुकसान झाले आह़े हे नुकसान पचवून शेतकरी पुन्हा शेतशिवारात कामाला लागल्याचे चित्र या भागात आह़े गहू आणि हरभरा पिकांचे नियोजन करत शेतक:यांनी कामांना सुरुवात केल्याचे दृश्य ब्राrाणपुरी व परिसरातील गावांमध्ये दिसून येत आह़े येत्या काळात अवकाळीची शक्यता कमी असल्याने हरभरा पेरणीला सर्वाधिक वेग दिला जात आह़े शेतशिवारात ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत करुन येत्या 15 दिवसात हरभरा आणि गहू पेरणी करणार असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आल़े आह़े  दरम्यान एकीकडे खरीप पिकांचे नुकसान झाले असताना अतीवृष्टीमुळे जमिनीत वाढलेला ओलावा हरभरा आणि गहू पिकांना तारक ठरणार असल्याचा अंदाज शेतक:यांचा आह़े या पाश्र्वभूमीवर शहादा तालुक्यात यंदा गहू आणि हरभरा पिकाचे क्षेत्र दुपटीने वाढणार असल्याचे सांगण्यात येत आह़े शेतकरी निर्धारित क्षेत्रापेक्षा हाती असलेल्या पडीक क्षेत्रातही पीकपेरा करण्याच्या पवित्र्यात असल्याने हा अंदाज दृढ होत आह़े ब्राrाणपुरी भागात प्रशासनाने नियुक्त केलेल्या पथकाकडून पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत़ परंतू या पंचनाम्यात फळबागांवरील कीड रोग आणि करपा याचा समावेश करण्यासाठी शेतकरी पथकांना माहिती देत आहेत़  करपा रोगाचे निदान झाल्यानंतर शेतक:यांनी रासायनिक औषधींची फवारणी करण्यास सुरुवात केली आह़े काही ठिकाणी पपईवर चांगल्या दर्जाचे फळ आल्याने ते टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत़ ब्राrाणपुरी परिसरातील केळी उत्पादकांना अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला आह़े केळीची झाडे उन्मळून पडण्यासह अनेक ठिकाणी केळीचे घड तुटल्याने नुकसान झाले होत़े करपामुळे या नुकसानीत वाढ होत असल्याने शेतकरी उपाययोजना करण्यावर भर देत आहेत़