शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात लोंबकळत्या वीज तारा उठताय जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 13:29 IST

धोकेदायक : महावितरणने लक्ष देण्याची गरज, अपघाताचा धोका वाढला

नंदुरबार : नंदुरबार शहरात ठिकठिकाणी धोकेदायक जीर्ण वीज तारांचे जाळे पसरलेले आह़े त्यामुळे महावितरण नागरिकांच्या जीवावर टपलयं की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारण्यात येत आह़े वीज तारा अत्यंत जीर्ण झाल्या असल्याने यातून एखाद्या मोठय़ा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही़ नंदुरबार शहरातील अनेक ठिकाणी घराला लागूनच विद्युत पोल आहेत़ त्यामुळे साहजिकच वीज तारा या घराला लागूनच जात असल्याचे दिसून येत असत़े त्यामुळे यातून एखादी मोठा अपघात होण्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही़ अनेक ठिकाणी महावितरणच्या वीज तारा लोंबकळलेल्या स्थितीत आह़े त्यामुळे हवेचा वेग वाढला की या तारा एकमेकांना लागून घर्षण निर्माण होत असत़े त्यामुळे साहजिकच यातून काही वेळा ठिणग्यादेखील पडत असल्याचे अनेक वेळा दिसून येत असत़े दरम्यान, अनेकांच्या घराला लागूनच वीज तारा गेल्या असल्याने काही नागरिकांकडून या वीज तारांना प्लॅस्टिक पाईपांचे आवरणदेखील  लावण्यात आले आह़े परंतु हा तात्पुरती उपाय असून महावितरणने याबाबत काही तरी कार्यवाही करुन ही समस्या दूर करावी अशी मागणी आता संबंधित नागरिकांकडून करण्यात येत आह़ेनंदुरबारातील टिळक रोडावर मोठय़ा संख्येने हाय होल्टेज वीज तारा लोंबकळलेल्या आहेत़ त्या शिवाय सिंधी कॉलनी, सुभाष चौक, होळतर्फे हवेली, तुप बाजार आदी वस्त्यांच्या ठिकाणीसुध्दा वीज तारांची दैनिय अवस्था झाली आह़े बहुतेक वीज तारा झाडांमधून गेल्या आहेत़ त्यामुळे हवेच्या वेगाने झाड हेलकावे खात असताना यातून वीज तारा तुटण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आह़े हाय होल्टेज वीज तारा असल्याने यातून जीवित हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ अनेक नागरिकांच्या गॅलरीमधूनही वीज तारा जात असतात़ घरात लहान मुले असल्याने यातून एखादी अप्रिय घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न विचारण्यात येत आह़े याबाबत उपअभियंता राजू रंजन यांना विचारले असता लवकर जीर्ण वीज तारा बदलण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितल़े