शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातील सेतू केंद्रात विद्याथ्र्याची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 12:54 IST

नियमापेक्षा जादा रकमेची मागणी : महसूल विभागाने लक्ष घालण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शैक्षणिक कामकाजासाठी आवश्यक असलेले विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी शहादा येथील माहिती व सेतू           सुविधा केंद्रातील कर्मचारी विद्याथ्र्याकडून जादा पैसे वसुल करीत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. नियमानुसार शुल्क भरल्यानंतरही दस्तावेज देताना पैशांची मागणी करण्यात येत असल्याचा प्रकार या सेतू केंद्रात राजरोसपणे सुरू      असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.दहावी-बारावीनंतर विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी व प्रवेशित झालेल्या विद्याथ्र्याना विविध शासकीय दाखल्यांची गरज असते. दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करताना नियमानुसार असलेले शुल्क जमा करण्यात येते.              त्यातही विविध दाखले व इतर दस्तावेजासाठी वेगवेगळी रक्कम आकारली जाते. एखाद्या दाखल्याचे 32 रुपये शुल्क असेल तर विद्यार्थी किंवा पालक 35 रुपये देतात. त्यानंतर सुटे नसल्याचे कारण पुढे करून उरलेले तीन रुपये ब:याच नागरिकांना परत देण्यात येत नाहीत. दाखल्यासाठी लागणारे शुल्क भरल्यानंतर पावती देण्यात येते. या पावतीत दाखला कधी मिळेल ते          नमूद केलेले असते. दिलेल्या  तारखेला किंवा वेळेला विद्यार्थी दाखला घेण्यासाठी सेतू सुविधा केंद्रात गेल्यानंतर परत 10 रुपयांची मागणी करून लूट करण्यात येत         आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने याबाबत संबंधित कर्मचा:याला विचारणा  केली तर आम्हाला प्रिंटरचा खर्च काढावा लागतो, असे उत्तर देण्यात येते.नियमापेक्षा जादा शुल्क घेण्यात असल्याच्या प्रकाराबाबत नायब तहसीलदारांना विचारले असता त्यांनी सांगितले की, दाखले देण्यासाठी नियमाप्रमाणे 32 रुपये शुल्क आकारल्यानंतर पुन्हा पैसे मागण्याची गरज नाही. याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.एकीकडे शासनाच्या महसूल विभागातर्फे महाराजस्व अभियान राबवून विद्यार्थी  व नागरिकांना  विविध दाखले गावोगावी जाऊन मोफत वाटप करण्यात येतात. तर दुसरीकडे सेतू सुविधा केंद्रात त्याच दाखल्यांसाठी जादा रक्कम घेऊन लूट करण्यात येत असल्याचा प्रकार सुरु असल्याने त्याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याबाबत जिल्हाधिका:यांनी तातडीने लक्ष घालून हा प्रकार थांबविण्याची गरज आहे.