शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या शोधात येणाऱ्या बिबट्याचे होतेय दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 20:33 IST

तळोद्यातील ग्रामस्थांमध्ये भिती : हलालपूर शिवारात हिंस्त्र प्राण्यांची समस्या

कोठार : तळोदा तालुक्यातील हलालपूर येथे मागील आठ दिवसांपासूनच बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे़ परिसरातील पाणवठे कोरडे झाले असल्याने पाण्याच्या शोधात हिस्त्र जनावरे गावाकडे धाव घेत असल्याचे यातून दिसून येत आहे़ त्यामुळे ग्रामस्थांकडून भिती व्यक्त करण्यात येत आहे़हलालपूर परिसरात सुुरुवातीला शेतशिवारांमध्ये अनेक वेळा बिबट्यांसह अनेक हिंस्त्र प्राण्यांचे दर्शन झाले होते़ परंतु आता हे प्राणी गावापर्यंत येत असल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली असल्याचे दिसून येत आहे़ अनेक पाण्याचे स्त्रोत कोरडे झाले असल्याने पाण्याच्या शोधात प्राणी गावात येत असतात़मागील आठ दिवसांपासून हलालपूर गावात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून वनविभाग मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.तळोदा तालूका हा सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने परिसरातील अनेक गावांच्या शेतशिवारात बिबट्यासह अन्य हिंस्त्र प्राण्यांचा वावर असल्याचे दिसून येते. साधारणत: ऊस, केळी, यांच्यासारख्या पिकांमध्ये बिबट्या, तरस, अस्वल यांसारखे प्राण्यांच्या अधिवास असल्याचे सातत्याने निदर्शनात आले आहे.उसतोड पूर्ण होऊन अनेक शेते रिकामी झाली असल्याने अधिवास व पाण्याच्या शोधात वन्य प्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे़हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढल्याने बचावासाठीच्या उपाययोजनाचे प्रशिक्षण शेतकरी व स्थानिक नागरीकांना वनविभागाकडून मिळणे गरजेचे आहे. शिवाय कोणतेही हिंस्त्र प्राणी आठळून आले तर कोणती खबरदारी घ्यावी व काय उपाययोजना कराव्यात याबाबत तरी जनजागृती होणे अपेक्षित आहे.