शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चांदसैली घाटात भाविकांचे वाहन पलटी लोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 10:52 IST

कोठार :  रंजनपूर येथील संत गुलाम बाबांच्या  दिंडीत सहभागी होण्यासाठी येणा:या भाविकांची जीप चांदसैली घाटात पलटी झाल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. यात बारा जण जखमी झाले असून त्यातील चार जण गंभीर जखमी असून त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव कुंडल येथील ...

कोठार :  रंजनपूर येथील संत गुलाम बाबांच्या  दिंडीत सहभागी होण्यासाठी येणा:या भाविकांची जीप चांदसैली घाटात पलटी झाल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. यात बारा जण जखमी झाले असून त्यातील चार जण गंभीर जखमी असून त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव कुंडल येथील भाविक शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त संत गुलाम महाराज यांच्या चौपळे येथून निघणा:या दिंडीत सहभागी होण्यासाठी जीप गाडीने निघाले होते. त्यांची गाडी कोठार ते चांदसैली दरम्यानच्या घाटात असताना चालकाला रस्ताच्या अंदाज न आल्याने गडावरील ताबा सुटून ती पलटी झाली. या अपघात हुण्या सोमा पाडवी (रा.खांडबारा), आहलीबाई रावला पाडवी, जात्र्या फुल्या पाडवी, गुलाब रावला पाडवी हे गंभीर जखमी झाले. जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर या अपघातातील अन्य जखमीमध्ये भागिराम बासरा पाडवी(55), भगतसिंग उस:या पाडवी(56), किशोर खेमा पाडवी(11), रावल्या तेज्या पाडवी(चालक) (रा.सर्व कुंडल) प्रताप गिम्ब्या वळवी(30), खेमजी पुण्या वळवी(32) (रा.कात्री), किसन कामा वसावे(30),गोवल्या बाया पाडवी(60) (रा.खांडबारा) यांचा समावेश आह़े यांना तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भागिराम बासरा पाडवी यांच्या फिर्यादीवरुन जीप चालकाविरुद्ध तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जगलसिंग वसावे व पोलीस कॉन्स्टेबल तारसिंग वसावे हे करीत आहेत.तळोदा ते धडगाव दरम्यान चांदसैली घाटमार्गे मोठय़ा प्रमाणात जीवघेणी अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. गाडीच्या टपावर 8 ते 10  प्रवासी बसलेले असतात. तर गाडीच्या आजूबाजूला देखील अनेक प्रवाशी लटकलेले असतात. वाहनातसुध्दा अनेक प्रवाशी शेळ्या मेंढय़ा सारखे कोंबलेले असतात. याकडे पोलीस यंत्रणेकडून कानाडोळा केला जात असल्याचा आरोप करण्यात येत      आह़े