शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा व विधानसभा स्वबळावरच लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 12:00 IST

सेनानेते संजय राऊत : प्रचाराची सुरुवात नंदुरबारातून करण्याचा मानस

नंदुरबार : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढणार असल्याचा पुनरुच्चार सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी नंदुरबार येथे पत्रकारांशी बोलतांना केला. आगामी प्रचाराची सुरुवात देखील नंदुरबारातूनच करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, नंदुरबार व अक्कलकुवा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आवाहन केले.कार्यकर्ता मेळाव्यासाठी खासदार संजय राऊत गुरुवारी नंदुरबारात आले होते. सायंकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेवून माहिती दिली. ते म्हणाले, पक्षाच्या दृष्टीने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्थानिक पातळीवर लढल्या जातील. निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीनेच आपण राज्यभर दौरे करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या काळात नंदुरबारातूनच प्रचाराची सुरुवात करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी नंदुरबार किंवा अक्कलकुवा येथे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जाहीर मेळावा घेण्यात येणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. काँग्रेसला नंदुरबार लकी होते. निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात, योजनांची सुरुवात ते येथूनच करीत होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी देखील नंदुरबारला पसंती देत शिवसेनेसाठी देखील नंदुरबार लकी राहील असा आशावाद व्यक्त केला आहे. आतार्पयत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीने आदिवासींना गृहीत धरूनच राजकारण केले आहे. परंतु आता दुसरी पिढी ही शिवसेनेकडे वळत आहे. त्यांनाही त्यांच्या हक्काची, अधिकाराची जाणीव झाली असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी युती करण्याबाबतचे सुतोवाच केल्याचे विचारले असता ते त्यांनाच माहिती. 2014 मध्ये का सुचले नाही. युती तोडण्याचा पुढाकार त्यांचाच होता. आता शिवसेना 2014 प्रमाणेच स्वबळावर आणि लोकसभा व विधानसभेच्या संपुर्ण जागांवर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयोध्येचा प्रश्न न्यायालयात सुटणारा नाही. केंद्र शासनाने अध्यादेश काढून हा प्रश्न सोडवावा अशी आमची मागणी आहे. आता प्रत्येक बाबतीत न्यायालयांमध्ये जाण्याचा प्रघातच पडला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची गरज नाही. शासनानेच काय ते ठरवून राममंदीराचा प्रश्न सोडावा असेही खासदार राऊत यांनी सांगितले. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांनी केलेले विधान हे स्थानिक परिस्थितीला धरून योग्यच होते असेही त्यांनी स्पष्ट करीत पाडवी यांची पाठराखन केली. यावेळी सेना नेते संजय उकिरडे, जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे, आमशा पाडवी आदी उपस्थित होते.