शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात ‘ब्लड ऑन कॉल’ला अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 12:55 IST

रक्तदानाबाबत उदासिनता कायम : चार वर्षात केवळ 592 रक्त बॅगांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य शासनाच्या महात्त्वाकांक्षी जीवन अमृत योजनेंतर्गत असलेल्या ‘ब्लड ऑन कॉल’ सेवेला नंदुरबार जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आह़े 2014 ते मार्च 2018 म्हणजे जवळपासून चार वर्षात केवळ 592 रक्त बॅगा पुरविण्यात आल्या आह़े सतत घटत जाणा:या रक्तदानाच्या प्रमाणामुळे अनेक वेळा मागणी असूनही रक्त बॅगांचा पुरवठा करण्यात येत नसतो़ वाढते अपघात, मातेचे गरोदरपण, लहान बालक आदींसाठी मोठय़ा प्रमाणात रक्ताची आवश्यकता असत़े त्यामुळे रक्तअभावी प्राणहानी होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून 2014 पासून जीवन अमृत योजना सुरु करण्यात आली़ या अंतर्गत जिल्ह्यासामान्य रुग्णालयामार्फत नोंदणीकृत असलेल्या दवाखान्यांना मागणीनुसार रक्त बॅगांचा पुरवठा करण्यात येत असतो़ शहर हद्दीच्या 40 किलो मीटर अंतराच्या परीक्षेत्रात या रक्त बॅगांचा पुरवठा करण्यात येत असतो़ नंदुरबार तालुक्यात 28 नोंदणीकृत दवाखाने या योजनेअंतर्गत रक्त बॅगा मागण्यास पात्र ठरतात़ शासकीय धोरणानुसार 104 क्रमांकाला दूरध्वनी केल्यानंतर सुमारे अर्धा तासात रक्ताचा पुरवठा करणे बंधनकारक असत़े त्यानुसार, 2014 साली 170 रक्त बॅगा पुरवण्यात आल्या़ त्याच प्रमाणे 2015  - 128, 2016 - 144, 2017 - 113 तर मार्च 2018 र्पयत 37 रक्त बॅगांचा पुरवठा ‘ब्लड ऑन कॉल’व्दारे करण्यात आला आह़े शहरापासून 40 किमी अंतरांतर्गत असलेल्या एखाद्या रुग्णाला तत्काळ रक्ताची आवश्यकता असल्यास तो 104 क्रमांकाच्या टोल फ्री नंबरला दूरध्वनी करुन रक्ताची मागणी करू शकतो़ त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून अर्धा तासाच्या आत संबंधित रुग्णाला रक्ताचा पुरवठा करण्यात येत असतो़ परंतु योजनेबाबत सर्वसामान्यांमध्ये माहिती नसल्याने अनेक लाभाथ्र्याची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आह़ेजिल्हा सामान्य रुग्णालयाकडून गरोदर माता, लहान बाळ, पिवळे रेशन कार्डधारक, जेष्ठ नागरिक, सिकलसेलग्रस्त आदींसाठी मोफत रक्त बॅगांचा पुरवठा करण्यात येत असतो़ जवळपास 90 टक्के रक्त पुरवठा हा मोफत करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा सामान्य प्रशासनाकडून देण्यात आली़ त्याच प्रमाणे इतर गरजुंना 500 रुपये प्रति बॅग रक्तपुरवठा करण्यात येत असतो़ उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असतो़ त्यामुळे साहजिकच प्रत्येकाच्या मागणीनुसार रक्ताचा पुरवठा करण्यास प्रचंड प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागत असत़े  अनेक वेळा दुर्गम भागात रक्तदान शिबिरे घेण्यात येत असतात़ परंतु त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसतो़ बोटावर मोजण्याइतकेच जण रक्तदानात सहभाग घेत असतात़ त्यामुळे रक्तदानात सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आह़े