शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल चार्जिंगसाठी जीवघेणा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 13:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोद्यालगत गुजरातच्या हद्दीत खाजगी साखर उद्योगाजवळ मोबाईल चार्जिंगसाठी ऊसतोड मजुरांकडून जीवघेणा खेळ सुरू आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोद्यालगत गुजरातच्या हद्दीत खाजगी साखर उद्योगाजवळ मोबाईल चार्जिंगसाठी ऊसतोड मजुरांकडून जीवघेणा खेळ सुरू आहे. मोबाईल चार्जिंगचा हा प्रकार एखाद्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता असून या साखर उद्योग व्यवस्थापनाने मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे.मोबाईल हे संपर्काचे महत्त्वाचे साधन बनले असून डिजीटल क्रांतीमुळे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. ऊसतोड मजूरही त्याला अपवाद राहिलेले नाहीत. तळोद्याला लागून असलेल्या अक्कलकुवा रस्त्यावर गुजरात हद्दीतील एका खाजगी साखर उद्योग परिसरात ऊसतोड करणारे शेकडो मजूर झोपड्या करून राहतात. याठिकाणी राहणाऱ्या जवळपास सर्वच ऊसतोड मजुरांकडे विशेषत: युवा वर्गातील प्रत्येकाकडे अँड्रॉईड मोबाईल आहे. मोबाईल असला तरी त्याठिकाणी राहणाºया ऊसतोड मजुरांना मोबाईलच्या चार्जिंगसाठी जीवघेणी कसरत करावी लागते.याठिकाणी राहणाºया ऊसतोड मजुरांना मोबाईल व इतर बॅटरीवर चालणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण चार्जिंग करता यावे यासाठी खाजगी साखर उद्योग व्यवस्थापनाकडून संरक्षक भिंतींवर विजेचे दोन बोर्ड बसविण्यात आले आहेत. या विजेच्या बोर्डावर मोबाईल चार्जिंगसाठी वेगवेगळे सॉकेट देण्यात आले आहेत. ज्यांना आपला मोबाईल चार्जिंग करायचा असेल तो त्याठिकाणी आपले चार्जर घेऊन येतो व मोबाईल आणि इतर उपकरणे चार्जिंग करून घेतो. याठिकाणी सकाळी कामाला जाण्यापूर्वी व संध्याकाळी कामावरून परतल्यावर मोबाईलच्या चार्जिंगसाठी अक्षरश: नंबर लागतात. नंबर लावण्यावरून बºयाचवेळा युवकांमध्ये बाचाबाची होत असल्याचा अनुभवही आहे. मोबाईलचे चार्जर सॉकेटमध्ये लावल्यानंतर मोबाईल कुठेतरी संरक्षक भिंतीवर अडकविण्यात येतो तर काही जण चार्जिंग होईपर्यंत मोबाईल हातात धरून तास-दीड तासभर त्याठिकाणी उभे राहतात. दोन्ही विजेचे बोर्ड संरक्षक भिंतीवर खिळ्यांच्या सहाय्याने बसविण्यात आलेले असून पुन्हा पुन्हा चार्जर लावल्या व काढल्यामुळे हे खिळे सैल होतात व बोर्ड भिंतीवरून निखळतो. हे बोर्ड कमी उंचीवर असल्याने चार्जिंगसाठी लहान मुलेही जीवघेणी कसरत करताना दिसून येतात.