शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यमान अभियानाची कार्यशाळा : तळोदा तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 13:11 IST

दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांना मिळणार महागडय़ा आरोग्य सेवेचा लाभ

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 25 : केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येथील प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीत पंचायत समितीच्या आरोग्य विभाग, ग्रामसेवक व आशा सेविकांची कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी या योजनेसाठी ग्रामसभेत ग्रामस्थांसाठी जनजागृती करण्याच्या सूचना कर्मचा:यांना देण्यात आल्या होत्या.समाजातील दारिद्रय़ रेषेखालील घटकाला महागडी आरोग्य सुविधा मिळण्यासाठी केंद्र शासनाने यंदापासून आयुष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य ही योजना सुरू केली आहे. हे अभियान विशेषत: ग्रामीण भागात राबविण्यासाठी येथील पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने सोमवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचा शुभारंभ तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते व गटविकास अधिकारी शरद मगर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या अभियानांतर्गत 30 मे 2018 रोजी आयुष्यमान भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक गावात ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे आयोजन करायचे आहे. या ग्रामसभेत ग्रामसेवकांनी गावक:यांमध्ये माहिती देवून जनजागृती करायची आहे. त्यानंतर आशा सेविकांनी 1 ते 7 मे 2018 दरम्यान ग्रामसभेत न आलेल्या कुटुंबाची गृहभेट घेवून माहिती देण्याच्या सूचनादेखील कार्यशाळेत देण्यात आल्या. या कार्यशाळेत ताुलका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण व डॉ.तुषार मोरे यांनी मार्गर्दन केले. कार्यशाळेत डॉ.कांतीलाल पावरा, डॉ.रेखा शिंदे, डॉ.सोहम पाडवी, डॉ.विशाल चौधरी, डॉ.सायसिंग पावरा आदींसह तालुक्यातील अंगणवाडी सुपरवायझर, आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी आरोग्य विस्तार अधिकारी एस.पी. वाघ, आरोग्य सहायक पाडवी, मनोज पिंजारी, डी.बी. माळस्कर, अहिरे, काळे आदींनी परिश्रम घेतले.