प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.पितांबर सरोदे यांचे ‘महात्मा गांधी यांचे वाचन आणि लेखन’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी महात्मा गांधी यांनी वाचन केलेले ग्रंथ आणि त्या ग्रंथांचा त्यांच्या जीवनावर झालेला प्रभाव उलगडून दाखविला. यात लिओ टॉलस्टॉय, भगवतगीता, राजा हरीश्चंद्र या ग्रंथांनी त्यांना घडविले, हे त्यांनी आपल्या आत्मकथा सत्याचे प्रयोग यात सांगितले असल्याचे म्हणाले. आपल्या जीवनात आचारणात आणलेले प्रयोग डॉ. सरोदे यांनी लक्षात आणून दिले. अध्यक्षस्थानी ॲड.रमणभाई शाह होते. कार्यक्रमास वाचनालयाचे सदस्य ॲड.केतनभाई शाह, रमाकांत पाटील, निंबाजीराव बागूल, कैलास मराठे यांच्यासह साहित्यिक व सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रवीण पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी सुदाम राजपूत, वर्षा टेभेकर, सुनील मराठे यांनी परिश्रम घेतले.
लोकमान्य टिळक जिल्हा वाचनालयात व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:11 IST