लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : खेतिया येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार चंद्रभागा किराडे यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी प्रांताधिकारी सुमेरसिंह मुजाल्दा उपस्थित होते. कापूस खरेदी शुभारंभप्रसंगी औरंगपूर, ता.शहादा येथील शेतकरी रामकृष्ण वसंत पाटील यांचा कापूस प्रती क्विंटल पाच हजार 555 रुपये दराने खरेदी करण्यात आला. शुभारंभाच्या दिवशी 33 क्विंटल कापसाची आवक होती. या वेळी बाजार समितीचे सचिव ओ.पी. खेडे, खेतिया कॉटन असोसिएशनचे अध्यक्ष महिपाल नाहर, व्यापारी दिलीप संचेती, कमल अग्रवाल, प्रशांत अग्रवाल, सुनील जैन, प्रवीण शाह, अंकित शाह, पंकज अग्रवाल, अमित मालवीय, अमित नाहर, दीपेश हरसोला, भिकमचंद जोशी, मुकेश टाटीया, डायाभाई पटेल, अरविंद बागूल, रोहिदास सोलंकी, संजय निकुम, राजेंद्र टाटीया, शेखर भावसार, खंडेराव सोनीस, भगवान चौधरी, राजेश नाहर व शेतकरी उपस्थित होते.
खेतिया बाजार समितीत कापूस खरेदी शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 12:43 IST