शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोमाई नदीवरील पुलाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 12:43 IST

कुकडेल-पिंगाणे : पाच किलोमीटरचे अंतर कमी होणार

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 4 : पिंगाणे ते कुकडेल दरम्यान गोमाई नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचा लोकार्पण सोहळा शनिवारी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार उदेसिंग पाडवी होते. या वेळी खासदार डॉ.हीना गावीत, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील,  उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, जि.प. सदस्य अभिजित पाटील,  कार्यकारी अभियंता जेलसिंग पावरा, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार मनोज खैरनार, भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाळे, तालुकाध्यक्ष डॉ.किशोर पाटील यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण व फित कापून पुलाचे विधीवत उद्घाटन केले. पालकमंत्री रावल म्हणाले की, हा पूल शहादे तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचा दुवा असून शेतक:यांसाठी लाभदायक ठरेल. एका बाजूला ग्रामीण भाग असून मंदिर आहे तर दुस:या बाजूला शहराला लागून मस्जिद असल्याने शहादा व पिंगाण्याला जोडणारा पूल म्हणजे एकोपा दर्शवणारा पूल आहे. शहादा शहराला जास्तीत जास्त माङया निधीतून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रय} असून नदीकाठावर चौपाटीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.खासदार डॉ.हीना गावीत म्हणाल्या की, शहादा शहर हे जिल्ह्याचे मध्यवर्ती शहर आहे. सोनगीर ते शहादा हा महामार्ग होणार असल्याने सातपुडय़ातील आदिवासींच्या विकासाचे केंद्र म्हणून धडगावदेखील जोडले जाईल. हा महामार्ग लवकर व्हावा म्हणून माझा पाठपुरावा सुरु असल्याचे त्या म्हणाल्या. आमदार उदेसिंग पाडवी म्हणाले की, गोमाई नदीवरील हा चौथा पूल असून स्व.पी.के. अण्णांच्या प्रेरणेने पूर्ण केला. या पुलामुळे पाच किलोमीटरचा चा फेरा वाचणार आहे. ग्रामीण भागाला जोडणारा दुवा ठरणार आहे.  सूत्रसंचालन दिनेश खंडेलवाल यांनी केले. कार्यक्रमास अधीक्षक अभियंता चंद्रकांत वाघ, उपअभियंता कमलाकर साळुंखे, ठेकेदार रवींद्र पाटील यांच्यासह  पिंगाणे ग्रामस्थ    व कार्यकर्ते  उपस्थित होते.