शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

ऊस व मका पिकाचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 12:13 IST

शहादा तालुका : काढणीवर आलेली पिके भुईसपाट, शेतकरी आर्थिक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी/रायखेड/असलोद : शहादा तालुक्यात पावसाने वादळवा:यासह जोरदार हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. लोणखेडा, असलोद, रायखेड परिसरात ऊस, मका, मिरची, केळी, कापूस आदी काढणीवर आलेल्या  पिकांचे वादळामुळे नुकसान झाल्याने शेतक:यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. या पावसामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आल्याने विहीरी व कुपनलिकांच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.ब्राrाणपुरी व भागापूर परिसरातऊस व मका पिकाचे नुकसानगेल्या आठवडाभरापासून ब्राrाणपुरी व भागापूर परिसरातील नागरिक उकाडय़ाने त्रस्त झाले होते. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे उकाडय़ापासून सुटका मिळाली असली तरी ऊस व मका पिकाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. भागापूर येथील शेतकरी हेमंत छोटूलाल पाटील यांचा पाच एकर व काशीनाथ नरोत्तम पाटील यांचा चार एकर ऊस वादळामुळे पूर्ण जमीनदोस्त झाला. ब्राrाणपुरी शिवारात मका पिकाची मोठय़ा प्रमाणावर लागवड केली आहे. मात्र मुसळधार वादळी पावसाने या पिकालाही आडवे केले आहे. वादळाने शेतक:यांच्या तोंडी आलेला घास हिरावून नेल्याने शेतक:यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. पिकांच्या नुकसानीची कृषी विभागाकडून फक्त पाहणी होत असल्याने शेतक:यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या पावसामुळे सुसरी नदीला पूर आला होता.रायखेड परिसरगेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांची स्थिती नाजूक बनत चालली होती. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र रविवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने शेतक:यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सुमारे दोन तास सुरू असलेल्या पावसामुळे अनेकांची धावपळ उडाली. शहादा-खेतिया मार्गावर वाहन चालकांनी मिळेल त्या जागेवर आपली वाहने थांबवून पाऊस उघडल्यानंतर पुढे मार्गस्थ झाले. हा पाऊस शेतक:यांना फायदेशीर ठरणार असल्याचे मत जाणकार शेतक:यांनी व्यक्त केले. लोणखेडालोणखेडा परिसरात यंदाच्या पावसाळ्यात रविवारी सर्वात जोराचा पाऊस झाला. वादळवा:यामुळे विद्याविहारजवळ लोणखेडा येथील नगीन काळू पाटील यांच्या शेतातील ऊस पूर्णत: जमीनदोस्त झाल्याने त्यांचे नुकसान झाले. इतर शेतक:यांच्या ऊस पिकाचेही मोठे नुकसान झाले. कापूस, मिरची, केळी, पपई या पिकांचेही वादळामुळे नुकसान झाले.असलोद परिसरातही नुकसानअसलोद परिसरात पावसाने रौद्ररुप धारण केल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. यंदा या भागात शेतक:यांनी उसाची लागवड मोठय़ा प्रमाणात केली आहे. मात्र वादळी पावसामुळे ब:याच शेतक:यांचे ऊस पिक पूर्णपणे आडवे पडल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. प्रकाश रघुनाथ पाटील, भटू गुलाबराव पाटील, अजय चंद्रसिंग गिरासे, दीपक सरदारसिंग गिरासे, मीना संजय कदम, नाना रावजी मराठे यांच्या शेतातील उसाचे पीक वादळामुळे जमीनदोस्त झाले आहे. तसेच तिधारे, कलमाडी व असलोद शिवारातही उसासह इतर पिकांचे नुकसान झाले. तलाठी एस.एस. राठोड यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा करून तहसीलदारांकडे अहवाल सादर केला.पंचनामे करण्याची मागणीशहादा तालुक्यात विविध ठिकाणी वादळी पावसामुळे              नुकसान झालेल्या पिकांची कृषी               व महसूल विभागाने तातडीने           पंचनामे करण्याची मागणी होत आहे. संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिका:यांनी पंचनामे करण्याचे आदेश काढून नुकसानग्रस्त शेतक:यांना तातडीने भरपाई मिळवून देण्याची मागणी होत आहे.