शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी पपई पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 11:54 IST

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील विविध गावांमध्ये पाण्याअभावी पपई पिकाची वाढ खुंटली आह़े पिक वाया जाणार असल्याने शेतक:यांकडून चिंता ...

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील विविध गावांमध्ये पाण्याअभावी पपई पिकाची वाढ खुंटली आह़े पिक वाया जाणार असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े परिसरातील पाणी पातळी खोल गेली असल्याने साहजिकच पिण्याच्या पाण्याचाही मोठा तुटवडा आह़ेनंदुरबार तालुक्यातील लहान शहादे, खोडसगाव, शिंदे, समशेरपूर, खोंडामळी, विखरण, बामडोद, भागसरी, कोळदे, पळाशी, पातोंडा, पथराई, सिंदगव्हाण, भालेर आदीसह परिसरात पपईचे पिक मोठय़ा प्रमाणात घेण्यात आलेले आह़े परंतु यंदा पावसाने पाठ फिरवल्याने या ठिकाणची पपईसह सोयाबीन, केळी, कापूस आदी पिकांची वाढ खुंटली आह़े पाण्याअभावी परिसराची स्थिती अत्यंत विदारक झालेली आह़े या ठिकाणच्या विहिरी तसेच कुपनलिकांनाही पाणी नसल्याने पिकांसाठी पाणी आणावे कुठून असा प्रश्न शेतक:यांसमोर निर्माण झाला आह़े पाणी नसल्याने बहुतेक शेतक:यांनी आपली शेते रिकामी केली आहेत़ याचेच एक प्रातिनिधीक उदाहरण म्हणजे खोडसगाव येथील सुरेश पाटील यांनी आपल्या 5 एकरावरील पपईवर रोटोव्हेटर फिरवून पिक नष्ट केले आह़े तसेच विलास पाटील, मोहन पाटील यांनीदेखील अनुक्रमे पपई व मिरचीच्या पिकावर रोटोव्हेटर फिरवले आह़े पाण्याची पातळी खोल गेलेली आह़े त्यातच सूर्य आग ओकत आह़े त्यामुळे पिकांची स्थिती अत्यंत दैनिय झालेली आह़े पिकांना पाणी मिळत नसल्याने त्यांची वाढ खुंटली आह़े केळी, पपई, मिरची आदी पिक करपायला सुरुवात झालेली आह़े पिकांना पाणी मिळत नसल्याने त्यांच्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव निर्माण झालेला आह़े काही ठिकाणी पपईचे झाड आकुंचन पावत आह़े पावसाअभावी कापूस, पपई, मिरची आदीचा उत्पादन खर्च काढणेही शेतक:यांना कठीण होऊन बसले आह़े त्यामुळे साहजिकच यातून मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आह़े विहिरींचे खोलीकरणनंदुरबार तालुक्यातील अनेक गावांमध्ये विहिरींचे खोलीकरण करण्यात येत आह़े त्यातून पाण्याचा उपसा केला जात आह़े दरम्यान, जिल्हा प्रशासनातर्फे यंदा मोठय़ा प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कामे करण्यात आलेली होती़ परंतु पावसाने पाठ फिरवल्याने पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला नाही़ शिवाय धरणे, लघुप्रकल्प तसेच इतर जलस्त्रोतही भरले नसल्याने पाणीटंचाईची दाहकता अधिकच वाढली आह़े जिल्ह्यात केवळ 67 टक्के इतका पाऊस झाला आह़े परतीच्या पावसानेही घोर निराशा केली आह़े त्यामुळे पुढील उन्हाळ्यार्पयत पाण्याची सोय होणे महत्वाचे आह़े पुढील पाऊस लांबला तर भिषण दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आह़े