शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईने होरपळताय ग्रामस्थ : लोभाणी गावाची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 12:09 IST

थकबाकीमुळे महावितरणकडूनही वीजपुरवठा खंडित

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 15 : तळोदा तालुक्यातील लोभाणी येथे गेल्या सहा महिन्यांपासून  पाणीटंचाईचा सामना करावा लागत आह़े महावितरणने ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा खंडित केला आह़े पाणीपुरवठा योजनेची थकबाकी असल्याचे कारण सांगत वीजपुरवठा खंडित केल्याने ग्रामस्थांचे ऐन उन्हाळ्यात हाल होत आहेत़ येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी हातपंपावर रांगा लावाव्या लागत आहे. याबाबत प्रशासनाने लक्ष देऊन पाण्याची समस्या दूर करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.गेल्या सहा महिन्यांपासून येथे पाणीपुरवठयाची समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे ग्रामस्थाना विशेषता महिला वर्गाला पाण्यासाठी तासन्तास हातपंपावर रांगा लावाव्या लागत आहे. उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याची गंभीर टंचाई जाणवू लागली आहेत.लोभाणी येथे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असून येथे मागील काही महिन्यांपासून महावितरणने पाणीपुरवठय़ाची वीज खंडित केली होती़ थकबाकी भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नसल्याचे ग्रामपंचायतीस कळवले होत़े त्यामुळे ग्रामपंचायतीकडून याबाबत कार्यवाही होणे अपेक्षीत होत़ेमात्र ग्रामपंचायतीने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने येथील ग्रामस्थ अक्षरश पाण्याअभावी होरपळत आहेत़ साधारण दोन हजार लोकवस्ती असलेल्या गावात ग्रामस्थांसह जनावरांनाही भीषण पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहेयेथे गुरांसाठी असलेला हौद पाण्याअभावी रिकामा असून परिणामी हातपंपावर दिवसभर ग्रामस्थाची गर्दी होताना दिसून येत आह़े   वास्तविक घरकुल योजनेच्या लाभाथ्र्याकडून गेल्या काही वर्षापासून सक्तीने कर वसुली केली जात़े    या ठिकाणी पाण्याची पातळीदेखील मोठय़ा प्रमाणात खालावली आह़े  त्यामुळे आधीच येथे पाण्याचा अभाव असून त्यात महावितरणकडून अशा प्रकारे वीजपुरवठय़ाची वीज खंडित करण्यात येत असल्याने ग्रामस्थ जेरीस आले आहेत़ याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन तत्काळ उपाय योजना करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होतेय़